टीम मंगळवेढा टाईम्स ।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी आपल्या दारी या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या 68 गटामध्ये व 11 नगरपालिकेच्या क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या नागरिकांच्या जनता दरबार मधील नियोजन पुस्तिकेतील कार्यकर्त्याच्या फोटो वरून मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीत गटबाजी उघड झाली.
त्यामुळे जनतेच्या तक्रारी ऐकण्या ऐवजी पक्षातील कार्यकर्त्यांचे फोटो नसल्याच्या तक्रारी ऐकण्याची वेळ पक्षाच्या नेत्यावर आली.
याबाबतची माहिती अशी की, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकाच्या जनता दरबार आयोजित असून या दौऱ्यामध्ये नागरिकांच्या त्यांच्या अडचणी निवेदनाद्वारे मांडण्याचे आवाहन करण्यात आले.
त्या निवेदनातील समस्था थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचे सूतोवाच करण्यात आले.दरम्यान याबाबत जिल्ह्यातील जनतेमध्ये प्रबोधन करण्यासाठी कार्यक्रम पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.
परंतु या पुस्तिकेमध्ये मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, शहराध्यक्ष, नगराध्यक्ष,पक्षनेते यांचे फोटो त्यामध्ये नसल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी राज्यात सत्ता विरुद्ध असतानादेखील कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून पक्षाच्या ताब्यात नगरपालिका व नगराध्यक्ष पद मिळवून दिले.
परंतु त्यांच्या कामाची दखल जिल्ह्यातील नेत्यांनी घेतली गेली नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली.
पंढरपुरातील राष्ट्रवादीतील गटबाजी थांबवण्यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना नाकी नऊ आले असताना अशा परिस्थितीत झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा पक्षाने गमावली.
भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लक्षात घेता पक्षाची बांधणी करण्यासाठी मताधिक्य दिलेल्या गावातील इतर कार्यकर्त्यांचा देखील या नियोजन पुस्तकेत विचार केला नसल्याचे बोलून दाखवले.
यामुळे या उपक्रमातील नियोजन पुस्तकेतील फोटोवरून झालेल्या गटबाजीचे प्रदर्शनाकडे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते कशा पद्धतीने लक्ष देऊन हा प्रकार थांबवून जिल्ह्यात पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात की 2009 च्या पंढरपूर विधानसभा निवडणुकीपासून पराभवाची लागलेले गालबोट यापुढील काळात देखील कायम राहते की काय याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली.(स्रोत : सकाळ)
कामाची कदर करावी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सह आगामी इतर निवडणुका ची बांधणी करताना राष्ट्रवादीच्या जिल्ह्या नेत्याने शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्या कामाची कदर करावे.जिल्ह्यात भाजप वाढत असताना राष्ट्रवादीचे गतवैभव मिळवण्यासाठी सर्वाना बरोबर घेवून जाणे पक्ष हिताचे होईल : अजित जगताप,पक्षनेते
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज