मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
गांजा विक्री करणाऱ्यासाठी आलेल्या एकाला ब्रम्हपुरी येथील एचपी पेट्रोल पंपाच्यासमोर शिवारात सापळा रचून अटक करण्यात आली. संशयितांकडून 2 किलो १८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रणजित माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापुसाहेब पिंगळे यांच्या पथकाने केली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, मंगळवेढा पोलीस ठाणे गु र नं 343/2023 गुंगिकारक औषधीद्रव्ये मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) ii (ब) या याप्रमाणे गुन्हा दाखल असुन
फिर्यादी नामे दयानंद हेंबाडे यांनी आरोपी नामे किरण पांडुरंग भिसे (वय २२ वर्षे रा- बेगमपुर, ता- मोहोळ) याचे ताब्यामध्ये २ किलो ०१८ ग्रॅम वजनाचा गांजा ब्रम्हपुरी येथील एचपी पेट्रोल पंपाच्यासमोर सोलापुर ते मंगळवेढा रोडवर मिळुन आल्याने गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांना गोपणीय माहीती मिळाली की ब्रम्हपुरी येथे एक इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे.
मिळालेल्या गोपणीय माहीतीच्या आधारे गोपणीय एनडीपीएस कायदयातील तरतुदींचे पालन करुन सोबत सपोनि पिंगळे, पोहवा हेंबाडे, पोशि घायाळ, पोशि मिसाळ, पोशि राऊत दोन पंच व फोटोग्राफर व तोलार यांचेसह दि ३०/०४/२०२३ रोजी १९/५१ वा ते २२/०० वा
दरम्यान रेड करणेकामी ब्रम्हपुरी येथील एचपी पेट्रोलपंपाच्या समोर जावुन सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकुन ४०,०००/- रुपये किमतीचा अमली पदार्थ गांजा २ किलो ०१८ ग्रॅम वजनाचा जप्त करण्यात आला.
आरोपी नामे किरण पांडुरंग भिसे याचेविरोधात गुन्हा नोंद केला आहे. दाखल गुन्हयातील आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि बापुसाहेब पिंगळे हे करित आहोत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक रणजीत माने, मंगळवेढा पोलीस ठाणे, सपोनि बापु पिंगळे, पोहेकॉ / दयानंद हॅबाडे, पोकों वैभव घायाळ, पोकों अजित मिसाळ यांनी सदरची कामगिरी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज