टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुंबई आणि मुंबई- शिर्डी (साईनगर) अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या १० फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन्ही गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
परंतु, त्यावेळी ते मुंबईत येणार की दिल्लीतून ऑनलाइन शुभारंभ करणार, याबतीत अजून काही ठरलेले नाही.
वंदे भारत रेल्वेत दिव्यांग प्रवाशांसाठी व्हीलचेअरची सुविधा असणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत ‘वंदे भारत’मध्ये प्रवाशांसाठी भरपूर सोयी असणार आहेत. त्या गाडीत स्वच्छता व टापटीपतेला प्राधान्य दिले जाते.
सोलापूरकरांना खूप वर्षांनी मुंबईसाठी सकाळची रेल्वे ‘वंदे भारत’च्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.
पण, ही रेल्वे नियमित असणार का, मुंबईहून निघताना रेल्वेची वेळ कोणती असेल, यासंदर्भात अजून काहीच स्पष्टता नाही. आज रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीनंतर ‘वंदे भारत’ संदर्भातील वेळापत्रक स्पष्ट होईल, असे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
सध्या श्री सिद्धेश्वर एक्सप्रेस रात्री १० वाजून ४० मिनिटांनी मुंबईला निघते. सिद्धेश्वर एक्सप्रेस दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता मुंबईला पोहचते. तर हुतात्मा एक्सप्रेस सकाळी साडेसहा वाजता सोलापुरातून निघते, पण ही रेल्वे पुण्यापर्यंतच आहे.
आता ‘वंदे भारत’मुळे सोलापूरकरांना सकाळी साडेबारा वाजेपर्यंत मुंबईत जाता येणार आहे. ही रेल्वे मुंबहून दुपारी चार वाजून १० मिनिटांनी निघेल आणि रात्री पावणेअकरा वाजता सोलापुरात पोहचणार आहे.
‘वंदे भारत’चा वेग ताशी १८० किमी आहे, पण सध्या तसा ट्रॅक नसल्याने तो वेग कमीच राहील, असे बोलले जात आहे. दरम्यान, आज बैठकीनंतर ‘वंदे भारत’चे अचूक वेळापत्रक प्रवाशांना समजणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज