मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवून जिंकण्यासाठी तालुक्यात अनेक हौशी उमेदवारांनी

खासगी सावकारांकडे एकर, दोन एकर जमीन गहाण ठेवून लाखो रुपये टक्केवारीने घेऊन निवडणूक लढवल्या. याबद्दल अनेक रंजक किस्से निवडणूक निकालानंतर चविष्टपणे चर्चिले जात आहेत.

राजकारणातून सत्तेची नशा एकदा चढली की काही खरे नाही, मग कोण काय करेल याचा नेम नाही. जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी कुणी ५० लाख, कुणी २५ लाख तर कुणी १० लाख रुपये खासगी सावकाराकडून पाच ते तीन टक्क्याने घेऊन निवडणूक रिंगणात उतरले.

तर अनेकांनी तालुका पंचायतीवर मेंबर होण्यासाठी एकर, दोन एकर जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवून निवडणुकीसाठी लाखो रुपयांचा निधी उभा केला आणि निवडणूक यंत्रणा, कार्यकर्ते व मतदारांवर खर्च केले आहेत. ऊस बागायत भागात राजकारणाचे भलतेच वेड दिसून येते.

एका बहाद्दर इच्छुकाने तर सासरवाडीत जाऊन मेहुण्याकडे आग्रह धरून एक कोटी रुपये आणले आणि निवडणुकीत खर्च करून टाकले.

परतफेड करताना पश्चात्ताप
ग्रामीण भागातील निवडणुकीत रंगीत, संगीत पार्ट्या, जेवणावळी, मतदारांना लक्ष्मी दर्शन करण्याची प्रथा आता सर्वश्रुत व रूढ झाली आहे. त्याशिवाय कार्यकर्ते व उमेदवारांना निवडणूक लढविल्यासारखे वाटतच नाही.
आणि मग त्यात हौसे, नवसे व गौसे कार्यकर्ते तुम्हीच निवडून येणार आहात; पण खर्च करा असा सल्ला देतात.

मग हौशी इच्छुक उमेदवार सावकाराकडून टक्केवारीने लाखो रुपये कर्ज घेतले. सावकाराकडील कर्जाची व्याजासह रक्कम परतफेड करताना उमेदवारावर पश्चात्ताप करण्याची वेळ येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













