मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
बँक खाते हॅक करून अनोळखी व्यक्तीने ८९ हजार ४५ रुपये परस्पर काढून घेत फसवणूक केली. या घटनेची नोंद २८ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे. उमेश काशिनाथ पाटील (वय ४४, रा. जुळे सोलापूर) यांनी याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ ऑगस्ट २०२५ रोजी पाच वाजण्याच्या मोबाईल सुमारास नंबर ९९८७३३३२३५ यावर अनोळखी चोरट्याचा मोबाईल नंबर ८९७२०६२६८३ या नंबरवरून व्हॉटसअॅप कॉल करून
अॅमेझॉन केअरवरून बोलतोय असे सांगून तुमचे पार्सल रिटर्न आले आहे ते परत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गुगल पे ला पाच रुपये पाठवा, असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादीने विश्वास ठेवत पाच रुपये रक्कम ही गुगल पेवरून त्या चोरट्याच्या मोबाईल नंबरवर सेंड केले असता फिर्यादीचे अकाउंट हॅक करून ८९ हजार ४५ रुपयांची रक्कम काढून घेतली. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली.
अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणं महागात
बनावट लिंक्स शेअर करणे हे एक गंभीर धोकादायक कृत्य आहे, ज्यामुळे अनेक लोक फसवणुकीला बळी पडतात. या लिंक्स बनावट बँकिंग, ग्राहक सेवा, सरकारी योजना किंवा अन्य कोणत्याही सेवांबद्दल असू शकतात.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज