मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
महावितरणने ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरु केली आहे. या योजनेसाठी दि. ३१ मार्च २०२४ नंतर सलग तीन वेळा ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरणा करणारे
सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. दि. १ जानेवारी ते दि. ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीजबिले भरुन योजनेच्या लाभाची संधी ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे.
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (LT Live) वीज ग्राहकांसाठी लागू असेल, ज्यांनी दि. १ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे दि. १ एप्रिल २०२३ ते दि.३१ मार्च २०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही.
ग्राहकांना – लकी ड्रॉ व्दारे स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच अशी आकर्षक बक्षिसे – दिली जाणार आहेत. ग्राहकांनी – ऑनलाईन पद्धतीने वीजबिल भरुन लकी डिजिटल ग्राहक योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पद्धतीने वीजबिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पद्धतीने वीज बिलाचा भरणा करता यावा,
यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल अॅपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीजबिल भरणा सूट दिली जाते.
परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पद्धतीने वीजबिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी व ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.
महावितरणच्या प्रत्येक उपविभाग स्तरावर एप्रिल, मे व जून २०२५ या प्रत्येक महिन्यात एक प्रमाणे तीन लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढण्यात येणार आहेत. प्रत्येक लकी ड्रॉ मध्ये पाच विजेत्यांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच ही बक्षिसे दिली जाणार आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 7588214814
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 7588214814 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज