टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील डोंगरगाव येथील दर्लिंग नारायण क्षीरगसार (वय.३२) याला दाखल असलेली केस काढून घे अन्यथा तुझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देवून दोन लाखाची खंडणी मागितली.
या प्रकरणी उज्वला दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय चिमाजी शिंदे, चंद्रकांत दत्तात्रय शिंदे, कल्पना दत्तात्रय शिंदे या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी दर्लिंग क्षीरसागर याला काही महिन्यापुर्वी दत्तात्रय शिंदे व इतर लोकांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून डोक्यात गज घालून जखमी केल्याने या घटनेची फिर्याद पोलिसांत क्षीरसागर यांनी दिली होती.
पोलिसांनी सदर आरोपींना अटक करून ते जामीनावर मुक्त होवून गावी येवून केस काढून घेणेबाबत दबाव टाकत होते.
दि.१० ऑगस्ट रोजी उज्वला शिंदे हिने जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याची तक्रार दिल्याने फिर्यादी क्षीरसागर याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होता.
सदर गुन्हयात फिर्यादी क्षीरसागर यास जामीनावर सोडण्यात आले होते. ते दि.२८ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वा.डोंगरगाव येथून वनीकरणाच्या रस्त्याने मोटर सायकल नं.एम एच १३ ए झेड ०५८ ९ वरून घराकडे जात असताना वरील चौघा आरोपीनी भा.दं.वि.कलम ३२६ ची केस मिटवून घे असे म्हणून वारंवार दबाव टाकला.
परंतू त्या दबावाला बळी पडलो नाही. वरील चौघा आरोपींनी दाखल केस मागे घे नाहीतर तुझ्यावर पुन्हा खोटी बलात्काराची केस दाखल करून जेलमध्ये टाकण्याची धमकी देवून २ लाखाची खंडणी मागितली तु पैसे दिले नाही तर तुला जीवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याने घाबरून मी तक्रार देण्यासाठी लवकर आलो नव्हतो.
काल दि .१० सप्टेंबर रोजी मला धीर आल्याने मी त्यांच्याविरूध्द तक्रार देण्यास आलो असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज