मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढ तालुक्यातीला पाटकळ येथील दीर-भावजयांनी कट रचून अनोळखी महिलेचा खून केला आणि ती भावजयच असल्याचे भासविल्याप्रकरणी
आरोपी प्रियकर निशांत सावत व प्रेयसी किरण सावत यांनी रचलेल्या कटासानुसार कडब्याच्या गंजीत जाळण्यासाठी मतिमंद महिलेला ११ जुलै रोजी पंढरपूर येथून दुचाकीवरून पाटखळ येथे आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून चौकशीत उघड झाले आहे.
आरोपी निशांत याने रात्री पाटकळ येथे आणून तिचा गळा दाबून खून करून घटनास्थळापासून १५० मीटर अंतरावर असणाऱ्या एका पडक्या घरात २ दिवस मृतदेह लपवून ठेवला असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. ही महिला गोपाळपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बारावीपर्यंत शिक्षण झालेला निशांत हा सातारा जिल्ह्यातील कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता. मात्र, त्याचे वहिनी किरणसोबत मागील काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते.
त्यामुळे २० दिवसांपूर्वी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनीही कुटुंबासह पोलिसांना चकवा देण्यासाठी एक भयंकर कट रचला.
निशांतने महिलेचा खून करून पडक्या खोलीत लपवलेला मृतदेह १४ जुलै रोजी रात्री २ वाजता चादरीत गुंडाळून आणून घराजवळील रचलेल्या कडब्याच्या गंजीत टाकला व त्यावर मोबाइल ठेवून गंज पेटवली.
किरणने आत्महत्या केल्याचीही अफवा पसरवली. पोलिसांना मात्र या घटनेबद्दल संशय होता. त्यांनी किरणच्या मोबाइलचा सायबर टीमकडून “सीडीआर” काढला. त्यानंतर निशांतच्या मोबाइलमधील किरणचे फोटो पाहून खात्री झाली आणि सत्य समोर आले.
२ हजारांचे डिझेल अन् नवीन गॅसची खरेदी
महिलेला पेटवण्यासाठी निशांत याने २ हजाराचे डिझेल आणले. तत्पूर्वी निशांत याने मंगळवेढा येथील एका गॅस एजन्सीमधून एक नवीन गॅस व शेगडी विकत घेतली. यातील गॅस सिलिंडर टाकी त्या पडक्या घरात ठेवल्याचे समोर आले आहे.
यातील केवळ शेगडी मात्र घरी नेली होती त्यावेळी घरच्यांनी फक्त नवीन शेगडी कशी काय आणली, सिलिंडर कुठे आहे, अशी विचारणा केली असता मला शेगडी लकी ड्रॉ मध्ये लागल्याचे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले
सदर जळीत महिलेला ११ जुलै रोजी दुचाकीवरून पंढरपूर येथून निशांत याने आणल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. सदर महिलेचे फोटो नातेवाइकांना दाखवून ओळख पटवणे शक्य होईल.-दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस निरीक्षक, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज