टीम मंगळवेढा टाईम्स।
श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली असून, मंगळवेढा तालुक्यात सर्वच गटाकडून निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे.
माजी आमदार प्रशांत परिचारक गट देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून, त्या अनुषंगाने निवडणूक लढवण्यासंदर्भात परिचारक गटाची मंगळवेढा येथे पांडुरंग परिवाराचे साखर कारखाना प्रमुख माजी आ.प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत
रविवार, दि.१५ मे रोजी बैठक होणार आहे.श्री संत दामाजी कारखाना निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
सभासदांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या असून, दि.१७ मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. जून महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.
सध्या आ.समाधान आवताडे व माजी आ.प्रशांत परिचारक हे एकत्रित काम करीत असले तरी कारखाना निवडणुकीत परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.
परिचारक गट वाढवण्याच्या दृष्टीने आगामी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कोरोनानंतर होणाऱ्या या ‘दामाजी’ च्या निवडणुकीत परिचारक गटाची काय भूमिका राहणार ?
यासाठी कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करण्यासाठी माजी आ.प्रशांत परिचारक गटाची बैठक रविवारी सकाळी १० वाजता श्रीराज (ताड) मंगल कार्यालय खोमनाळ रोड, मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासदांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन पांडुरंग परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज