टीम मंगळवेढा टाईम्स ।
दोन ते तीन दिवसांपूर्वी केवळ किरकोळ स्वरूपाचा ताप आला होता. बरं वाटू लागल्यानंतर सकाळी लवकर उठली. चहा-बिस्कीट खाल्ले. जवळपास आठच्या सुमारास पेपर सुरू झाला.
सव्वा नऊच्या सुमारास अचानक चक्कर येत असल्याचे निमित्त झाले. शाळेतून पटकन दवाखान्यापर्यंत मृत्यूनं तिला गाठलंच. अस कसं झालं म्हणत मुलीच्या आईने फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता.
इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पेपर लिहिताना अचानक चक्कर आली अन् काही वेळातच ती गतः प्राण झाल्याची धक्कादायक अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडली.
अनन्या अतुल भादुले (वय ९) असे मृत विद्यार्थिनीचे नांव आहे. अनन्या ही अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजता परीक्षा देण्यासाठी ती शाळेत आली होती.
मराठी विषयाचा पेपर सोडवत असताना अचानक तिला चक्कर आली. त्यानंतर अगदी काही क्षणात तिने हातपाय वाकडे केले. तिची ही अवस्था पाहून वर्गातील इतर विद्यार्थी व शिक्षक घाबरून गेले. शिक्षकांनी तात्काळ
अनन्याला उचलून येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
अनन्या हिची तब्बेत गेल्या दोन-तीन दिवसांपासून ठीक नव्हती. तिला ताप येत होता. गुरुवारी बरे वाटू लागल्याने आणि परीक्षा असल्याने पालकांनी तिला शाळेत पाठविले, असे समजते.
परंतु, पेपर सुटण्यास कांही वेळ शिल्लक असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार अनन्या हिला ब्रेन हॅमरेज झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या घटनेनंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याबाबतचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे तिच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याची शक्यता
अचानक झटका आल्यानंतर अनया हिला १ तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान मेंदूचा २ प्रेशर वाढून मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे डॉ.प्रदीप केसे यांनी कुटुंबीयांना सांगितले.
तीन दिवसांपूर्वी आला होता ताप
अनया हिला दोन ते तीन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर औषधपचार घेऊन बरे वाटू लागल्यानंतर गुरुवारी ती परीक्षेसाठी शाळेला आली होती.
परीक्षेच्या दिवशी सकाळी ती
लवकर उठली. अंघोळ करत चहा- बिस्कीटदेखील घेतले. शाळेत पेपर सुटत आला असतानाचा तिला काळाने गाठले.
घरात शांत, शाळेत हुशार
अनया ही शांत स्वभावाची होती. घरामध्ये ती नेहमी शांत राहत असायची. शाळेमध्ये मात्र ती हुशार होती. तिचे वडील एका शाळेमध्ये क्लार्क तर आई घरकाम करतात. चार वर्षांचा एक लहान भाऊ रोहन आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज