पंढरपूर शहरात पावसाचा धुमाकूळ, रात्रभर मुसळधार पावसाने कुंभार घाटावरील नवीन बांधकाम कोसळले, आतापर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढले अद्यापही प्रशासनाकडून शोधकार्य सुरु आहे. Pandharpur Chandrabhaga river Wall Collapsed at and Six died
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र कुंभार घाटावर असणार हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. यामध्ये आत्तापर्यंत सहा जणांचे मृतदेह मिळाले आहेत.
प्रशासनाकडून अद्यापही शोधकार्य सुरू आहे. कुंभार घाटा जवळील या नवीन घाट सुशोभीकरणाच्या कामाच्या जवळच या लोकांनी छोट्या छोट्या झोपड्या टाकल्या होत्या. त्या ठिकाणी ते फुल विक्री प्रसाद विक्री नारळ विक्रीचा व्यवसाय करत होते. आणि त्यावरच आपली गुजराण करत होते. मात्र आज दुपारी दीडच्या सुमारास मुसळधार पावसाने नवीन घाटाचे बांधकाम कोसळले वीस फूट उंचीची भिंत या लोकांच्या अंगावर कोसळली. यामध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरीत हाहाकार उडाला आहे. चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे. Wall Collapsed at Chandrabhaga river and Six died in Pandharpur
पावसामुळे या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खास करून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते.
भिंत कोसळल्याने त्याचा मोठा आक्रोश सुरू झाला होता. नक्की ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले मुख्याधिकारी अनिकेत मानूरकर हे जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत शहराच्या विविध भागातून उपनगरातून आजच्या पावसाने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील राजवाड्याचा बुरूज ढासळला. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्याला झोडपले आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झाले असून टाकळी, कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज