मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क।
महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हे गुरुवार ८ व ९ जून रोजी पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर ते पालखी मार्ग पाहणी व वारकरी व्यवस्था नियोजनाचा आढावा घेणार आहेत.
८ जून रोजी ३ वाजता वालचंदनगर येथून मोटारीने नातेपुते (ता. माळशिरस) कडे प्रयाण. ३:३० वाजता ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी थांबा, नातेपुते येथे आगमन होणार आहे. पालखी मुक्कामाची व्यवस्था पाहणी ते करणार आहेत. ३:४५ वाजता मोटारीने पुरंदावडे (ता. माळशिरस) ते प्रयाण करतील.
तेथे ज्ञानेश्वर महाराजांच्या गोल रिंगणाची व्यवस्था पाहणार आहेत. ४:१५ वाजता ते माळशिरसकडे प्रयाण करणार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी थांबाची पाहणी होणार आहे. ४:४५ वाजता मोटारीने वेळापूरकडे प्रयाण करतील.
५ वाजता ज्ञानेश्वर महाराजांच्या वेळापूर येथील पालखी मुक्कामाची व्यवस्था पाहिली जाणार आहे. ५:१५ वाजता (तोंडले-बोंडले) भंडीशेगाव येथे जाणार आहेत. आषाढी वारी पालखी सोहळा थांबा, पिराची कुरोली (तुकाराम महाराज पालखी स्थळ) येथेही पालखी मुक्कामांची व्यवस्था पाहणार आहेत.
भंडीशेगाव सोलापूर येथे आगमन होणार आहे. पालख मुक्कामाची व्यवस्था पाहणी करून चर्चा करणार आहेत. पालखी मार्गाने वाखरीकडे प्रयाण करणार आहेत.
आषाढी वारी पालखी सोहळ थांबा वाखरी येथे आगमन होणार आहे पालखी मुक्कामाची व रिंगण व्यवस्थ केली जाणार आहे. ६:२० वाजत मोटारीने पालखीमार्गे पंढरपूरकडे प्रयाण होणार आहेत.
६:३० वाजत के.बी.पी. कॉलेज पंढरपूर येथे आषाढी वारीचे नियोजन व तयारी आढाव बैठक होणार आहे. रात्री ८:३० वाजत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आगमन होणार आहे. माउलींचे दर्शन घेऊन ते मोटारीने शासकीय विश्रामगृह पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत.
दुसऱ्या दिवशीही होणार तयारीची पहाणी
■ पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे दुसया दिवशी शुक्रवार, दि. ९ रोजी सकाळी ८:३० वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे आगमन होणार आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी ९ वाजता पंढरपूर शहर नगरपालिका, ग्रामीण वारीनिमित्त केलेल्या नियोजनाच्या तयारीची पाहणी करणार आहेत. ११ वाजता ते पुन्हा शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण करणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज