टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा येथील शिर्के मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये उद्यापासून बालरोगतज्ज्ञ डॉ.अमोल परदेशी हे रुजू होणार असल्याची माहिती डॉ.शरद शिर्के यांनी दिली आहे.
आता 24 तास शिर्के मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. डॉ.मधुकर कुंभारे यांच्या हस्ते ओपीडीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
डॉ.अमोल परदेशी हे, नवजात बालकाच्या वाढीसाठी तज्ञ सल्लागार म्हणून काम पाहिले आहे. आत्तापर्यंत त्यांनी दिल्ली व मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात कामे पाहिले आहे.
आधुनिक लसीकरण, वजन व उंची कमी जास्त असलेल्या बाळांसाठी व मुलांसाठी योग्य निदान व उपचार, बेल बेबी क्लीनिक , नवजात बाळाचे कावीळ निदान व उपचार,
नेबुलायझर (वाफेची मशीन) उपलब्ध आहे, नवजात बाळापासून ते पंधरा वर्षे वयोगटातील क्लिपट आजाराचे निदान व उपचार केले जाणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज