मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही ती भरावीच लागते.
अशा कायमस्वरूपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरू आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभघेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू आहे.
थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे.
सुरुवातीला यासोबतच मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याचीदेखील सोय थकबाकीमुक्तीसाठी आहे.
वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.
सोलापुरातील ५,५९८ ग्राहकांनी घेतला लाभ…
सोलापूर मंडलातील ५,५९८ ग्राहकांनी ४ कोटी ६८ लाखांचा भरणा केला आहे. यातील काही लाभार्थीनी कनेक्शन पुनजॉडणी केले असून नव्या ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली.
अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या संकेतस्थळावर तसेच मोबाइल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाइन शक्य नसल्यास अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी केले आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज