टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.दामाजी संस्थेचे माजी उपाध्यक्ष वै.ह.भ.प. तात्यासाहेब जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज रविवार दि .१ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता वै.ह.भ.प.तात्यासाहेब जगताप यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती पांडुरंग जगताप यांनी दिली.
सकाळी १० वाजता अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तसेच श्री.समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा आंबेकर आजरेकर फड प्रमुख ह.भ.प. गुरूवर्य भागवत चवरे महाराज यांचे किर्तन , दुपारी १२ वाजता वै.ह.भ.प. तात्यासाहेब जगताप यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी,
वारकरी मंडळींना श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वाटप , दुपारी १२.१५ वाजता महाप्रसाद वाटप तसेच दुपारी १ वाजता नामवंत कलाकारांचे भारूड तसेच रात्री ९ वाजता संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विष्णुपंत जगताप यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज