मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
शासन आपल्या दारी व महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वितरणासाठी सोलापूर जिल्हाभरात आगामी १५ दिवसांत महाशिबीरांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.
या महाशिबीरांमध्ये महसूल विभाग, संबंधित पंचायत समिती विभाग, कृषि विभाग, नगरपरिषद व नगर पंचायत, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण विभाग, ग्रामविकास, आरोग्य, प्रादेशिक परिवहन विभाग यासह अन्य विभाग सहभागी होणार आहेत.
या विभागांकडून उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन किमीलेअर प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला (महाराष्ट्र राज्य), आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखला (सेंट्रल), विविध प्रकारचे दाखले,
नवीन दुबार शिधापत्रिका, नवमतदार नोंदणी, इमारत बांधकाम योजना, संजय गांधी योजना, फेरफार प्रत उपलब्ध करून देणे, आधार कार्ड अपडेशन, महिलांना शिलाई यंत्र वाटप, दिव्यांग साहित्य वाटप, महिला सखी किट वाटप,
मुलींना सायकल वाटप, घरकुल योजनास सीमांत शेतकरी गट बांधणे, कृषि अभियांत्रिकी, शेती व बाजार किट, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेतकरी ते ग्राहक थेट बाजारपेठ, कृषि सेवा केंद्राचे परवाने,
गायी, म्हैशी, शेळी, मेंढी वाटप, आयुष्मान कार्ड, विवाह नोंदणी, शिकाऊ चालक परवाना व इतर सर्व विभागांच्या योजना आदी सेवा देण्यात येणार आहेत.
तालुका, शिबिराचे ठिकाण, दिनांक यांचा तपशील पुढीलप्रमाणे
मंगळवेढा – मंगळवेढा (२१ ते २६ मे), उत्तर सोलापूर (१८ ते २६ मे ) – नॉर्थ कोर्ट प्रशाला, सोलापूर, बार्शी – तहसील बार्शी महसूल मंडळ स्तरावर (२२ ते २६ मे), दक्षिण सोलापूर मुस्ती, संभाव्य (०२ जून), – मंद्रुप – जिल्हा परिषद माध्यमिक शाळा (२६ मे) अक्कलकोट- अक्कलकोट,
चपळगाव, कुरनूर, वागदरी, मैंदर्गी, दुधनी, जेऊर, नागपूर, करजगी, तडवळ ( २२ ते ३१ मे), पंढरपूर उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांचे कार्यालयासमोर असलेले प्रांगण, पंढरपूर (०६ जून), मोहोळ – ९ महसूल मंडळ स्तरावर (२६ मे),
माळशिरस पंचायत समिती सभागृह, माळशिरस (२५ ते २७ मे), माढा – पंचायत समिती सभागृह कुर्डुवाडी, १० महसूल मंडळ स्तरावर (२३ ते ३१ मे), करमाळा – ११ महसूल मंडळ स्तरावर (२१ ते २६ मे ), सांगोला – बचत भवन, पंचायत समिती (२६ मे) याप्रमाणे महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज