मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अडचणी व इतर प्रश्नासाठी सोडवणूक करावी,व वृत्तपत्र विक्रेत्यासह वृत्तपत्र व्यवस्थेतील सर्व घटकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ कार्यान्वित करण्यासाठी या मागणीसाठी मंगळवेढा तालुका वृत्तपत्र एजंट व विक्रेता संघटनेच्या वतीने अध्यक्ष विजय भगरे यांच्या नेतृत्वाखाली मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्यात तीन लाख च्या आसपास वृत्तपत्र विक्रेते असून या संघटनेच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षापासून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी ते पाठपुरावा करीत असून
राज्य शासनाने 7 मार्च 2019 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या समस्या व त्यांच्या संबंधित कल्याणकारी योजनेचा प्रस्ताव व अंमलबजावणी करण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त असंघटित कामगार कार्यालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती घटीत करण्यात आली होती
या समितीने तयार केलेला अहवाल 17 नोव्हेंबर 2019 रोजी राज्य शासनाला सादर करण्यात आलेला आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कामाचे स्वरूप हे इतर कामापेक्षा भिन्न असून त्यांच्यासाठी सुंदर कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना त्याचा लाभ दिला पाहिजेत अशी स्पष्ट शिफारस या अहवालामध्ये केली.
त्यांच्या प्रश्नाचे अध्यक्ष सोडवणूक झाली नसल्यामुळे आज मंगळवेढा तालुका वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या अहवालात नमूद केल्याप्रमाणे निधीची तरतूद करून हे मंडळ कार्यान्वीत करावे, अशी मागणी करताना वृत्तपत्र विक्रेत्यासह वृत्तपत्र व्यवस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून मंडळ कार्यरत करणे,
वृत्तपत्र विक्रेते व व्यवसायातील सर्व कर्मचाऱ्यांनी असंघटित कामगार व नोंदणी सूरू कराव्यात, आरोग्य ,शैक्षणिक पेन्शन आदीसह योजना ताबडतोब लागू कराव्यात, गटई कामगाराप्रमाणे मोक्याच्या ठिकाणी स्टॉल उपलब्ध करून द्यावे आधी मागण्या या निवेदनात नमूद केल्या.
या मागण्याचा निपटाला लवकरच करावा अन्यथा आमच्या हक्कासाठी हक्काच्या मागणीसाठी आंदोलन करावा लागेल आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा अध्यक्ष विजय भगरे यांनी दिला. यावेळी सकाळचे बातमी बातमीदार दावल इनामदार, बाळासाहेब नागणे, माणिक घुले, परमेश्वर कलुबर्मे, अजय भगरे,हुकूम मुलाणी, प्रथमेश नागणे, बिराप्पा भंडगे आदी उपस्थित होते
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज