मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
देशांतर्गत व राज्यातील बाजार समितीमध्ये नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे.
शनिवारच्या तुलनेत सोमवारी (दि. १६) म्हणजेच दोन दिवसांत कमाल बाजारभावात १ हजार रुपयांची, तर मागील चार-पाच दिवसांत सरासरी बाजारभावात ३ हजार रुपयांची मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
बार्शीतील लक्ष्मी सोपान बाजार समितीत लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. सोमवारी १२ ते १५ हजार कट्टे आवक झाली आहे. लासलगाव, नाशिक जिल्ह्यातील तसेच
अहिल्यानगर, पुणे, चाकण, सोलापूर हैदराबाद, बेंगलोर यांसह देशांतर्गत असलेल्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत नव्याने येत असलेल्या लाल कांद्याची आवक अधिक आहे.
त्यामुळे मागील आठ दिवसांचा विचार करता ५,५००-६,००० पासून कमी होत ४,०००-४,५०० शनिवारी ३,७००-३,८००- ४,००० असलेला दर हा सोमवारी ५०० रुपयांपासून ३००० ते ३२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.
म्हणजेच आठ दिवसांत दर अडीच ते ३ हजारांनी कमी झाले असल्याचे लक्ष्मी सोपान बाजार समितीतील खरेदीदार प्रशांत जामदार यांनी सांगितले.
मागील आठ दिवसांपर्यंत आवकही मर्यादित प्रमाणात असल्यामुळे कांद्याचे दर टिकून होते. एका आठवड्यात लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधील कांदा बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे.
लाल कांद्याची साठवण क्षमता फार कमी असते. त्यामुळे काढणीनंतर लगेच शेतकरी कांदा बाजार समितीत विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. बार्शी बाजार ही धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी, कळंब, धाराशिव, सोलापूर जिल्ह्यांतील माढा, करमाळा आणि जामखेड तालुक्यातील कांदा विक्रीसाठी येत आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज