मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
ट्रक स्पेअर पार्टसचे कमिशन देण्यावरुन एकाच्या डोकीत कोल्ड्रींक बाटली मारुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याची
धमकी दिल्या प्रकरणी जहीर अब्बास पटेल (रा.टोळनाका, मंगळवेढा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी बालेसाहेब शेख (रा.मेटकर गल्ली,मंगळवेढा) हे व्यवसायाने मेकॅनिकल मिस्त्री असून दि.6 रोजी रात्री 8.30 च्या दरम्यान
छत्रपती संभाजीराजे चौक टोळनाका येथे चालत येत असताना वरील आरोपी याने जवळ येवून ट्रक स्पेअर पार्टसच्या कमिशनची मागणी केली असता
फिर्यादीने त्यास कमिशन मी देवू शकत नाही असे म्हणताच आरोपीने शिवीगाळ करीत जवळ पडलेली कोल्ड्रींकची बाटली घेवून डोकीत मारुन गंभीर जखमी केले व जीवे मारण्याची धमकी देवून निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज