टीम मंगळवेढा टाईम्स ।
क्रिकेट खेळावयास घेतले नसल्याच्या कारणावरून चिडून एकाने 30 वर्षीय तरूणास बॅटने डोकीत व हातापायावर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी अरकान रईस मुल्ला (रा.मुलाणी गल्ली,मंगळवेढा) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील जखमी फिर्यादी आदिल अब्बास मुलाणी (वय 30 वर्षे) हा दि.28 एप्रिल रोजी सायंकाळी 5.00 वा.गल्लीतील मुले व तो क्रिकेट खेळण्यासाठी दामाजी रोडवर असलेल्या शिंदे मळा येथे गेले होते.
वरील आरोपीने क्रिकेट खेळायला घेतले नाही म्हणून हातातील बॅटने फिर्यादीच्या डोकीत व हातावर,पायावर मारून गंभीर जखमी केले.
या घटनेनंतर आयान मुलाणी,आयान बागवान,मंजूर मुलाणी,अमन मुलाणी यांनी भांडणे सोडवा सोडवी केली.
आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमी फिर्यादीस चक्कर येत असल्याने उपस्थित क्रिकेट प्रेमींनी त्यास शिर्के हॉस्पीटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज