टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथील श्री.लक्ष्मीदेवी पालखीचे दर्शन घेऊन आप्पासो बलभिम लोखंडे (३५) हे मोटारसायकलवरून घराकडे परतत असताना वाटेत ९ जणांनी अडवून
हुर्रे म्हणल्याचा जाब विचारल्यानंतर त्यास फायटर पंचने, लोखंडी पाईपने डोळ्यावर, कमरेवर मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी
सोनू उर्फ बिरूदेव कोळेकर, विकास कोळेकर, सोनू कोळेकर, प्रकाश कोळेकर, नानासो कोळेकर, शंकर कोळेकर, शिवाजी कोळेकर, मोहन कोळेकर, नितीन कोळेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यातील जखमी फिर्यादी आप्पासो लोखडे हे रड्डे गावातील लक्ष्मी देवीची पालखी असल्याने ते व त्यांचा पुतण्या किरण लोखंडे मोटर सायकलवरून गावात आले होते.
रात्री १०.३० च्या दरम्यान निंबोणी रोडने जात असताना वरील आरोपी सर्वजण दारूच्या नशेत आरडा ओरडा करीत होते.
यावेळी फिर्यादी व त्याचा पुतण्या जात असताना आरोपीने हुर्रे असे म्हणून ओरडले असता मोटारसायकल थांबवून फिर्यादीने तुम्ही मला पाहून का ओरडला अशी विचारणा केली असता
आरोपीनी जवळ येवून शिवीगाळ करून हातातील फायटर पंचने दोन्ही डोळ्यावर ठोसे मारले.
फिर्यादीचे भाऊजी रंगनाथ गडदे यांनी जखमीस उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथे प्राथमिक उपचार करून सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केले.
शुद्धीवर आल्यानंतर मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याचा अधिक तपास पोलिस हवालदार सुनिल गायकवाड हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज