टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभागाचे निरीक्षक एस.एस. कदम यांनी त्यांच्या पथकासह मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात एका ठिकाणी छापा टाकला असता, तेथून देशी दारूचे ३० बॉक्स जप्त करण्यात आले.
दुपारच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क, माळशिरस विभागाचे निरीक्षक कदम, सांगोलाचे दुय्यम निरीक्षक छत्रे व जवान तानाजी काळे, वाहन चालक नवले यांच्या पथकाने मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावाच्या हद्दीत नकाते वस्तीमधील एका पडक्या घरात धाड टाकली.
त्या ठिकाणी संशयित आरोपी पांडुरंग विठ्ठल कोळी ( वय ३४ , रा . उचेठाण , तालुका मंगळवेढा ) याने अवैधरीत्या दारू विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेली देशी दारू संत्रा १८० मिली क्षमतेचे ३० बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त केलेल्या दारूची किंमत एक लाख ८०० रुपये इतकी असून , संशयित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १ ९ ४ ९ च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास एस . एस . कदम करीत आहेत.
ठाकरे, पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; एकावर गुन्हा दाखल
करकंब मधील एका व्हॉट्स अप ग्रुपवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत हिंदू-मुस्लिम समाजात तेढ निर्माण करणारी पोस्ट टाकल्याबद्दल येथील ब्रह्मनंद महाराज मठातील नारायणदास गोपालदास बैरागी महाराज यांच्या विरोधात करकंब पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत युवा सेना पंढरपूर तालुका प्रमुख रणजित कदम यांनी फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीत म्हटले आहे की , पवन चव्हाण अॅडमीन असणाऱ्या शूरवीर महाराणा प्रताप या व्हॉट्सअप ग्रुपवर
बैरागी यांनी सकाळी ९ .४० वाजता शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाने दोन धर्मा मध्ये भावना दुखावतील अशी पोस्ट टाकली आहे.
सदर पोस्ट दोन्ही धर्मीयांत दंगल घडवून आणण्याच्या दृष्टीने टाकल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यानुसार बैरागी यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १५३ , २ ९ ५ (अ), ५०० व आयटी अॅक्ट कलम ६६ ( ए ) अनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी पोलीस ठाण्यात बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज