टीम मंगळवेढा टाईम्स।
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या संचालिका तेजस्विनी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या भगवा फेटा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रॅलीचे आयोजन इंग्लिश स्कूल मंगळवेढा ते दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, चोखामेळा चौक व मारुती पटांगण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
त्यानंतर रॅलीचे समारोप होईल. अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित सर्व महिलांना शिवशंभो महिला पतसंस्थेच्या चेअरमन तेजस्विनी कदम यांच्या वतीने भगवे यांच्या फेटे घालण्यात येणार आहेत.
रॅलीमध्ये इंग्लिश स्कूल मंगळवेढा प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे ढोल पथकांचे विशेष आकर्षण असणार आहे.
तरी आज सर्व महिलांनी भगवा फेटा रॅलीसाठी वेळेवर इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढाच्या संचालिका तेजस्विनी कदम यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज