टीम मंगळवेढा टाईम्स ।
आज कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक पार पडते. पण, यंदा निवडणुकांमुळे राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
आचारसंहितेमुळे यंदा विठुरायाची शासकीय महापूजा पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांच्या हस्ते होत आहे.
विठ्ठलाच्या महापूजेत लातूर जिल्ह्यातील उमरगा येथील भाविक दाम्पत्य बाबुराव सगर आणि सागरबाई सगर मानाचे वारकरी ठरले.
या महापूजेसाठी मानाचे वारकरी ठरलेले सगर कुटुंबीय हे गेली 14 वर्षांपासून पंढरीची वारी करत आहेत. गवंडीकाम करून ते आपला चरितार्थ चालवतात.
कार्तिकी सोहळ्यानिमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीनं सजविण्यात आले होतं. पुणे येथील भक्त राम जांभूळकर यांनी विठुरायाच्या गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट केली आहे.
आपल्या लाडक्या माऊलीचं गोजिरं साजिरं रूप डोळ्यांत साठवण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे. आज होत असलेल्या कार्तिकी सोहळ्यासाठी सहा लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.
संपूर्ण पंढरी नागरी विठुनामाच्या जयघोषानं दुमदुमून गेली आहे. अवघी पंढरी दुमदुमून गेली आहे
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज