टीम मंगळवेढा टाईम्स ।
सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी नागरिकांना प्रत्येकी एक किलो साखर, चणाडाळ, रवा आणि पामतेल या चार वस्तूंचा संच फक्त १०० रुपयांमध्ये
पुढील दोन दिवसांमध्ये शिधावाटप दुकानांमधून उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, असे मंगळवेढ्याचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले.
दिवाळीनिमित्त या चार वस्तू फक्त १०० रुपयांत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या वस्तू जनसामान्यांपर्यंत अल्पावधीत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या वस्तू पुढील दोन दिवसापर्यंत सर्व शिधावाटप दुकानांमध्ये पोहोचवून वाटप सुरू होईल, असे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 3 हजार 485, प्राधान्य कुटुंबातील 20 हजार 309 शिधावाटप पत्रिकाधारकांना प्रत्येकी एक संच वितरित करण्यात येणार आहे.
एकूण 23 हजार 794 शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे, अशी माहिती तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज