टीम मंगळवेढा टाईम्स ।
नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गावरील मंगळवेढा व सांगोल्यातील बाधित शेतकऱ्याच्या मोबदल्यावरून व झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीच्या मागणीसाठी
गेल्या 21 दिवसापासून उपोषणास बसलेल्या प्रहार मधील उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्यामुळे त्याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
तब्बल 21 दिवसाच्या उपोषणाची ना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू ना प्रशासन यांनी दखल न घेतल्यामुळे उपोषणकर्त्याला रुग्णालयात दाखल व्हावे लागले.
काल दुपारपासून उपोषणकर्ते सिद्राया माळी यांच्या प्रकृतीमध्ये अस्वस्थता जाणवू लागल्याने तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी या प्रकाराची माहिती पो.नि. रणजीत माने यांच्या कानावर घातली
त्यांनी तात्काळ महसूलच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर तहसीलदार स्वप्निल रावडे व पो. नि.रणजीत माने घटनास्थळी हजर झाले.
रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्यामुळे पो.नि. रणजित माने यांनी स्वतःच्या गाडीत नेण्याची तयारी दर्शविली मात्र उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिल्यामुळे रात्री उशिरा 8.30 वा रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून सोलापूरला पाठवण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाचे काम झाले असून यासाठी संपादीत जमिनीच्या मोबादल्यावर शेतकय्रांना वारंवार संघर्ष करावा लागला यासाठी प्रहार संघटनेने महाविकास सरकार असतानाही आंदोलन केले,
सत्ताबदलानंतरही पुन्हा प्रहार संघटनेच्या वतीने याच प्रश्नावर उपोषण करण्यात आले. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील या प्रश्नावर गांभीर्याने घेतले नाही.
21 दिवस दिवसात जबाबदार अधिकाय्रांनी या उपोषणाकडे पाठ फिरवल्याने पदाधिकाय्राचा प्रशासनाबदलचा रोष वाढत आहे अदयापही यावर तोडगा निघाला नाही.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे मंगळवेढा दौऱ्यावर येवूनही त्यांनी देखील या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत त्यांच्या नियमित प्रशासकीय कामकाज करत काढता पाय घेतला.
काल आरपीआय (खोब्रागडे गट)आघाडी यांनी देखील प्रांत कार्यालयाच्या प्रवेशव्दारासमोर आंदोलन करून प्रशासनाला या प्रश्नाची तीव्रता दाखवण्याचा प्रयत्न केला एकंदरीत या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचा बाधित शेतकऱ्यांचा प्रश्न मात्र चव्हाट्यावर आला.
आला परंतु प्रशासनाचे डोळे कधी उघडणार असा सवाल मात्र या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.(स्रोत:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज