टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील हॉटेल आस्वादच्या वतीने आज शुक्रवार दि 31 डिसेंबर रोजी सायं.6 ते रात्री 8 पर्यंत आठवडा बाजार मंगळवेढा येथे नशा नको मोफत गुळाचा चहा ह्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज समाजामधील वाढती व्यसनाधिनता लक्षात घेऊन नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल आस्वादच्या वतीने सामाजिक बांधीलकी जोपासत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
वेगवेगळ्या नशेमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत तसेच तरुण पिढी नशा केल्यामुळे अपघाताचे व वेगवेगळ्या अपराधांचे प्रमाण वाढले आहे.
त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची मोठी हानी होत आहे यासाठी व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी नशा नको आरोग्यदायी गुळाचा चहा प्या
हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे हा आव्हान हॉटेल आस्वादचे मालक सतीश दत्तू यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज