टीम मंगळवेढा टाईम्स ।
फक्त ६५० रुपये दराने एक ब्रास वाळू मायबाप सरकार सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामध्ये ३५० रुपये वाहतूक खर्च लावण्यात येणार असून
“एक हजार रुपयात एक ब्रास वाळू’ घरपोच करण्याची तयारी सुरू असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जाहीर केले आहे.
पूर्वीप्रमाणे होणारे वाळूचे लिलाव रद्द करून वाळू डेपोची निर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या वाळू डेपो निर्मितीमुळे वाळू माफियांना मात्र चपराक बसली आहे.
महाराष्ट्रामध्ये वाळूला चांगली किंमत मिळत असल्यामुळे शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात राज्यातून पॅकिंग करून वाळू महाराष्ट्रात येत होती.
राज्यातील प्रत्येक नदीमधील वाळू चोरीसाठी नवनवीन फंडे वापरून राज्यभर वाळू चोरीचे धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले होते. फडणवीस यांच्या या निर्णयामुळे वाळू चोरीला आळा बसणार आहे.
नव्या धोरणाची लवकरच अमंलबजावणी होणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यासाठीची तयारी करावी, अशा सूचना महसूल खात्याला देण्यात आल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातही लवकरच वाळू लिलावाऐवजी “वाळू डेपो” ही संकल्पना अमलात येणार आहे. त्यासाठी “वाळू माफियांची बंद होईल मुजोरी आणि वाळू पोहोचेल घरोघरी” असे स्लोगन स्वतः उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच दिले आहे.
विविध विभागांच्या परवानग्यांमुळे वाळू लिलाव हा जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखीचा विषय बनला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि गोरगरिबांना कमी दराने वाळू मिळावी, अशी मागणी अनेक स्तरांतून जोर धरत होती.
याचा विचार शासनाने गांभीर्याने केला आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी या धोरणाबाबत खुलासा केला.
वाळू माफियांना सरकारी चपराक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या धोरणाची पोस्ट स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून केली आहे.
वाळू निर्णयाची त्वरित अंमलबजावणी व्हावी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षे वयाच्या नागरिकांना एसटीत मोफत प्रवास जाहीर करण्यात आल्यानंतर आठ दिवसातच अंमलबजावणी सुरू झाली. ९ मार्च रोजी महिलांना एसटी तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत जाहीर केल्यानंतर १७ मार्चला अंमलबजावणी सुरू झाली.
याचप्रमाणे “एक हजार रुपयात एक ब्रास वाळू” या निर्णयाची अंमलबजावणी ही लवकर करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज