टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथील रहिवाशी आणि सध्या मुंबई येथे काम करीत असलेल्या माथाडी कामगाराने त्याच्याच शेतात दारूच्या नशेत विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सदर घटनेची फिर्याद नंदेश्वर गावचे पोलीस पाटील संजय गरंडे यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. मारुती हरिबा मोठे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवार दिनांक २५ रोजी सकाळी अकरा वाजता नंदेश्वर गावचे पोलीस पाटील संजय गरंडे यांना गावातीलच एका युवकाने गावातीलच मोटे यांच्या शेतात एक अनोळखी व्यक्ती मयत झाली असल्याचे माहिती दिली.
यानंतर पोलीस पाटील गरंडे यांनी घटनास्थळी जाऊन सदर घटनेची माहिती गावात व तसेच सोशल मीडियावर पसरवीत मयत व्यक्ती ओळखीचे असल्यास मंगळवेढा पोलीस ठाण्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या आवाहनानंतर मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मयत व्यक्ती हा मारुती हरिबा मोटे असल्याचे सांगितले. मारुती मोटे यांच्या प्रेताजवळ दारूच्या बाटल्या आणि केमक्रोन नावाचे विषारी औषध सापडले.
यावरून मारुती मोठे यांनी दारूच्या नशेत विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची समजले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज