mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 25 मिनिटांच्या भाषणातील प्रत्येक शब्द…; पाकिस्तान थरथरला

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 12, 2025
in राष्ट्रीय
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

पहलगाम हल्ल्यानंतर झालेले ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर पाकिस्तानसोबत झालेला संघर्षाची अखेर शस्त्रसंधीमध्ये झाली. गेल्या २० दिवसात झालेल्या या सर्व घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम देशवासियांना संबोधीत करून भारताची भूमिका पुन्हा एकदा जगासमोर स्पष्ट केली.

पंतप्रधान मोदींनी गेलेल्या २५ मिनिटांच्या भाषणात फक्त पाकिस्तानला इशारा दिला नाही तर संपूर्ण जगाला देखील सांगितले की, भारताने दहशतवादी कारवाई स्थगित केली आहे. जर पाकिस्तानकडून पुन्हा काही गडबड झाली तर भारत त्याला चोख उत्तर देईल

आता फक्त दहशतवाद, पीओकेवरच चर्चा होईल; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला मोठा इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादी हल्ला आणि शस्त्रसंधी उल्लंघनावरून पाकिस्तानवर तोफ डागली. पाकिस्तानच्या भूमिकेवर पंतप्रधान मोदींनी कठोर शब्दात टीका केली. युद्धविरामानंतर आता चर्चा फक्त दहशतवाद आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरवर होईल, अशा कठोर शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला इशारा दिला.

पाकिस्तानच्या हल्यानंतर भारतीय सैन्य दलाने दिलेल्या चोख प्रत्युत्तराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं. पाकिस्तानातील दहशतवादी आणि ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधान मोदींनी मोठं भाष्य केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटींवर प्रत्युत्तर देऊ. त्या जागेवर जाऊन कठोर कारवाई करू, जिथे दहशतावादाचं मूळ आहे’

‘अणुहल्ल्यावरून ब्लॅकमेल करणे भारत खपवून घेणार नाही. भारत लक्ष्यभेद करणार, निर्णायक प्रहार करणार. दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवादी म्होरक्यांना वेगवेगळे पाहणार नाही.

ऑपरेशन सिंदूरदरम्यान जगाने पाकिस्तानचा खरा चेहरा बघितला आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना अत्यंयात्रेला मोठेमोठे अधिकारी उपस्थित होते. हा मोठा पुरावा आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत आणि आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी नेहमीच पावलं उचलत राहू. युद्धाच्या मैदानावर प्रत्येक वेळी पाकिस्तानला धूळ चारली आहे. यावेळी ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिलं आहे. आपल्या क्षमता दाखवून दिली. श्रेष्ठता सिद्ध केली. या ऑपरेशनदरम्यान भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची क्षमता सिद्ध झाली. प्रत्येक प्रकारच्या दहशतवादाविरोधात सगळ्यांची एकजूट राहणे, एकता ही सर्वात मोठी ताकद आहे, असे पंतप्रधान मोदी पुढ म्हणाले.

‘निश्चितपणे हे युग युद्धासाठी नाही. पण हा युग दहशतवादाचाही नाही. दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स हा एक चांगल्या युगाची हमी आहे. पाकिस्तानी सैन्य, सरकार ज्या पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतंय.

ते एक दिवस पाकिस्तानलाच संपवून टाकेल. जर त्यांना वाचायचं असेल तर त्यांना दहशतवाद नष्ट करावं लागेल. शांततेचा दुसरा कोणताच मार्ग नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

दहशतवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही. मी आज जगाला सांगतो की, आमची घोषित नीती आहे की, जर पाकिस्तानशी चर्चा झाली तर दहशतवादावरच होईल. पाकव्याप्त काश्मीर म्हणजे पीओकेवरच होईल, असे मोदी म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी

संबंधित बातम्या

‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 20, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

मुख्यमंत्र्यांच्या मुलाची राजकारणात एन्ट्री; आता थेट उपमुख्यमंत्री होणार, राजकीय चर्चांना उधाण

March 9, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Breaking : सोलापुरातील सर्व स्पेशालिटी हॉस्पिटलची नावे व हेल्पलाइन जारी

काय सांगताय..! बीपीच्या गोळ्यांचे टेन्शन संपले, वर्षातून फक्त २ इंजेक्शन आणि रक्तदाब कायमचा नियंत्रणात; काय आहे नवीन संशोधन?

February 27, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

टीम इंडियाच्या वाघांनी पाकिस्तानचा फडशा पाडला, आधी फलंदाजांनी धुतलं; नंतर गोलंदाजांनी कंबरडं मोडलं, भारताचा मोठा विजय

February 15, 2026
Next Post
मोठी बातमी! कृषिभूषण अंकुश पडवळे यांना पिस्तुल दाखवून केली जबर मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे नेमके प्रकरण; जाणून घ्या..

मोठी बातमी! मंगळवेढ्यात मोटर सायकलस्वारास कंटेनरने दिली जोराची धडक; माजी सैनिक जागीच ठार

ताज्या बातम्या

मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

March 30, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

स्थानिक पोलिसांनाही थांगपत्ता लागणार नाही; एसपींचे ‘गुप्त पथक’ करणार कारवाई; सोलापूर ग्रामीणमध्ये ‘खळबळ’; एसपींचे विशेष पथक ॲक्टिव्ह; अवैध धंद्यांचे ‘काउंटडाउन’ सुरू

March 30, 2026
पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

पालकांची चिंता! मंगळवेढ्यात ओल्या आणि सुक्या माव्याचा विळखा: युवा पिढीचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष; नागरिकांची तस्करीवर बंदीची मागणी

March 29, 2026
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

धक्कादायक! सरकारी रुग्णालयात दाखल 6 वर्षीय चिमुकल्याचे डॉक्टरने दुसरेच बोट काढले; पंढरपुरातील घटनेने खळबळ

March 29, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा