समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स
प्रत्येक क्षेत्रात कष्ट असते. येणाऱ्या काळात युवा महोत्सवाच्या माध्यमातून आर्ची म्हणून नाहि तर तुमच्या नावाने एक वेगळी ओळख निर्माण करा असे आवाहन विद्यार्थ्यांना अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने केले आहे.
दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात 18 व्या युवा महोत्सवाच्या बक्षीस वितरण सोहळ्या प्रसंगी ती बोलत होती.
याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, प्र. कुलगुरू राजेश गादेवार, वित्त व लेखा अधिकारी श्रेणीक शहा, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. सुजित कदम, कुलसचिव योगिनी घारे, डॉ.सुभाष कदम, डॉ.मीनाक्षी कदम, तेजस्विनी कदम, सचिवा प्रियदर्शनी कदम-महाडिक, माजी प्राचार्य श्रीधर भोसले, डॉ.विश्वनाथ आव्हाड, यशपाल खेडकर, यातीराज वाकळे आदीजन उपस्थित होते.
अभिनेत्री रिंकू राजगुरू पुढे बोलताना म्हणाली की, हरलो म्हणून खचून न जाता सारखे प्रयत्न करून पुढे जाण्याचे प्रयत्न सुरू ठेवावेत.
आपल्या कामावर लक्ष देऊन आपण यश संपादन करू शकतो, कॅमेरा समोर जाताना धडपन येत होते, मी माझ्या भूमिकेत गेल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले,
ऑडिशन देत राहिले पाहिजे, वशिलेबाजीने कोठेच काहीही होत नाही, आपण प्रामाणिक काम करून, कष्ट करून यश मिळते असे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रिंकू राजगुरु म्हणाली.
प्र.राजेश गादेवार बोलताना म्हणाले की, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम यांनी युवा महोत्सवाचे उत्तम आयोजन केले आहे. कार्यक्रमात कोणताच खंड न पडता अखंडित कार्यक्रम सुरू राहण्यासाठी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाने योग्य नियोजन केले.
मंगळवेढा तालुक्यातील गोरगरीब जनतेसाठी स्व.दलित मित्र कदम गुरुजी यांनी शिक्षणाची दारे खुली केली. युवा महोत्सवाला निसर्गाने सुध्दा साथ दिली आहे.
विद्यार्थ्यांनी आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी उभी करावी. येणाऱ्या काळात त्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी ही ऊर्जा कामी येणार आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या सारख्या अनेक अभिनेत्री या युवा महोत्सवातून नक्कीच घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कुलसचिव योगिनी घारे बोलताना म्हणाल्या की, या युवा महोत्सवाच्या निमित्ताने येणाऱ्या काळात यातूनच कोणीतरी आर्ची व परशा घडतील, विद्यार्थ्यांनी देखील युवा महोत्सवात चांगले सादरीकरण केले आहे.
अँड.सुजित कदम व त्यांच्या परिवाराने युवा महोत्सवात सर्वांची चांगली व्यवस्था केली आहे. त्याबद्दल सोलापूर विद्यापीठाच्या वतीने त्यांच्या मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
बार्शीच्या विद्यार्थ्यांनी काढले रिंकूचे छायाचित्र
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या सैराट फेम आर्ची रिंकू राजगुरु तिचे हाताने रेखाटलेले छायाचित्र. विद्यार्थ्यांनी रिंकू राजगुरुला दिले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज