मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरहून आलेला आहे. तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटीश्वर शिवाचार्य स्वामीजी (वय 64) यांना लोखंडी गजाने शरिरावर विविध ठिकाणी मारुन
गंभीर जखमी केल्याप्रकरणात राजू कोरे,मंजुनाथ कोरे,भिमू कोरे,प्रमोद कोरे,संतोष कोरे, सिध्दू कोरे आदींना पोलीसांनी अटक करुन मंगळवेढा न्यायाधिश व्ही.के.पाटील यांच्यासमोर उभे केले असता त्यांनी या सर्व आरोपींना एकंदरीत आत्तापर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेची हककीत अशी,यातील फिर्यादी राचोटीश्वर स्वामीजी हे सिध्दनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेल्या 36 वर्षापासून रहावयास आहेत.
या संस्थानमध्ये ते धर्मोपदेशनाचे काम करतात. दि.3 मार्च रोजी रात्री 9 वाजता फिर्यादीस वरील आरोपींनी सी.सी.टी.व्हीची तोडफोड करत मठाचा मीच पुजारी व मालक आहे ,
तु बाहेरहून आला असून तुझा येथे काहीहीएक संबंध नाही तु बाहेर ये असे म्हणत खोलीतून बाहेर ओढत आणून फिर्यादीस वरील आरोपींनी लोखंडी गजाने पाठीवर,उजव्या खांद्यावर,दोन्ही मांड्यावर,नडगिरीवर मारुन गंभीर जखमी केले होते.
याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही.व्ही.लातुरकर यांनी केला. या आरोपींना 5 मार्च रोजी 4.49 वाजता अटक करुन त्यांना न्यायालयात उभे केले होते.
यावेळी सुरुवातीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तद्नंतर तीन दिवसाची पोलीस कोठडीत वाढ केली. दि.10 रोजी पुन्हा न्यायालयात उभे केल्यावर एक दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली. असे एकूण सहा दिवसाची सहा आरोपींना पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान सरकार पक्षाच्यावतीने अॅड.क्षिरसागर यांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला. यामध्ये सी.सी.टी.व्ही.फुटेज जप्त करणे,गुन्ह्याचा सखोल तपास करणे
आदी कामासाठी पोलीस कोठडीची मागणी केल्यानंतर न्यायालयाने ती मान्य करुन पोलीस कोठडी सुनावली. फिर्यादीच्यावतीने अॅड.शिवानंद पाटील यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड.एम.बी.गायकवाड यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज