टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र जोपर्यंत दिले जात नाही, तोपर्यंत माढा तालुक्यातील लव्हे आणि वडाचीवाडी या दोन्ही ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी मतदानावरील बहिष्काराचा ठराव केला आहे. तसेच सर्वच राजकीय पक्षांतील नेते मंडळींना गावांमध्ये प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात प्रथम बारलोणी ग्रामपंचायतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार व नेत्यांना गाव बंदीचा ठराव मंजूर केला.
त्याचबरोबर गावामध्ये सर्व पक्षाच्या नेते व पुढारी यांना राजकीय सभानां बंदीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. बैठकीस सरपंच नवनाथ गपाटे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
याबाबत येणाऱ्या काही दिवसातच बारलोणीत गावाच्या वेशी समोर आगामी निवडणुका, मतदान बहिष्कार व सर्वपक्षीय नेत्यामंडळींना गाव बंदी असल्याचा मोठा फलक लावण्यात येणार असल्याचे जाहिर केले.
माढा तालुक्यातील भोसरे ग्रामपंचायत ने देखील ओबीसी प्रवर्गामधून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या अशी मागणी करत पुढाऱ्यांना गाव बंदीचा आणि निवडणुकांवर बहिष्काराचा ठराव घेण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज