ADVERTISEMENT
mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदींनंतर पंतप्रधानपदी कोणाला पसंती? शरद पवार की गडकरी? सर्व्हेमध्ये खुलासा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 23, 2021
in राष्ट्रीय
पंतप्रधान मोदी आज लाँच करणार ‘संपत्ती कार्ड’; लाखो गावकऱ्यांना फायदा, महाराष्ट्रातल्या 100 गावांचा समावेश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये जर देशात आज निवडणुका घेतल्या गेल्या तर भाजपाच पुन्हा बहुमताने सत्तेत येईल असे समोर आले आहे.

यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत, हे देखील समोर आले आहे. परंतू मोदींनंतर पंतप्रधान कोण? यावरही लोकांनी एका नावाला पसंती दिली आहे.

इंडिया टु़डे आणि कार्वी इनसाईट्सच्या मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.३ जानेवारी ते १३ जानेवारी २०२१ दरम्यान १२,२३२ जणांदरम्यान सर्वेक्षण करण्यात आलं. यापैकी ६७ टक्के लोकं ग्रामीण तर ३३ टक्के लोकं शहरी भागातील होती.

आता निवडणुका पार पडल्यास लोकसभेच्या ५४३ जागांपैकी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४३ टक्के मतांसह ३२१ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केवळ भाजपाला ३७ टक्के मतांसह २९१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे युपीएला २७ टक्के मतांसह ९३ जागा मिळू शकतात. यापैकी काँग्रेसला १९ टक्के जागांसह केवळ ५१ जागांवर समाधान मानावं लागू शकतं. तर अन्य पक्षांना ३० टक्के मतांसह १२९ जागा मिळण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधानपदी जनतेला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पहायचे आहे. सध्यातरी लोकांना नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झालेले पहायचे आहेत.

परंतू दुसऱ्या क्रमांकावर किंवा मोदी यांच्यानंतर कोण पंतप्रधान हवेत असे विचारल्यावर लोकांनी योगींच्या नावाला पसंती दिली आहे. योगी आदित्यनाथांना 10 टक्के लोक तर गृहमंत्री अमित शहांना 8 टक्के लोक पंतप्रधानपदी पाहू इच्छित आहेत. यावरून योगींची लोकप्रियता वाढत असल्याचे दिसून आले आहे.

सर्व्हेनुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना 7 टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. तर 5 टक्के लोकांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिली आहे. सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांना 4 टक्के लोकांना पसंती दिली आहे.

तर प्रियंका गांधी यांना 3 टक्के लोकांनी पाठिंबा दिला आहे. यानंतर मायावती, अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नितीशकुमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2-2 टक्के लोकांनीच पंतप्रधानपदी पसंती दिली आहे.

आजवरचे आवडते पंतप्रधान कोण?

सर्वेक्षणानुसार आजवरच्या सर्वात आवडते पंतप्रधान बनण्याचा मानही नरेंद्र मोदी यांनाच मिळाला आहे. ३८ टक्के लोकांनी ते आजवरचे उत्तम पंतप्रधान असल्याचं म्हटलं.तर १८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाला पसंती दिली.

११ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि ८ टक्के लोकांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आजवरचे आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदी
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

कर्नाटकात भाजप कोमात, काँग्रेस जोमात; काँग्रेसची जोरदार मुसंडी; बहुमताचा आकडा आता फक्त काही जागांवर दूर

आत्मपरीक्षण! काँग्रेसच्या पराभवासाठी ‘ही’ गोष्ट कारणीभूत? 2024 च्या निवडणुकीआधी वाजली धोक्याची घंटा

December 4, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

कौतुकास्पद! सोलापूरच्या अर्शिनची भारतीय संघात निवड; दुबईमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील आशिया कपसाठी खेळणार; जिल्ह्यातील पहिला खेळाडू ठरला

November 26, 2023
मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर; कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या

विद्यार्थ्यांनो! बारावीत ‘जीवशास्त्र’ नसेल, तरीही होता येईल डॉक्टर; इच्छुकांसाठी ऐनवेळी अतिरिक्त परीक्षेचा पर्याय

November 25, 2023
दुबईत महाराष्ट्राचा दबदबा! दुबईतील क्रिकेट स्पर्धेत राॅयल मराठा संघाचा दणदणीत विजय

दुबईत महाराष्ट्राचा दबदबा! दुबईतील क्रिकेट स्पर्धेत राॅयल मराठा संघाचा दणदणीत विजय

November 24, 2023
नवे संकट! घरोघरी खो खो खोकला; कोरोनानंतर आता नवी डोकेदुखी, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली; काळजी घेण्याचे आवाहन

धाकधूक वाढवली! चीननं पुन्हा कोरोनासारख्याच रहस्यमयी आजाराचा उद्रेक; WHO नं मागितला अहवाल

November 24, 2023
आशिया चषकात भारत-पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला; कोणाचं पारडं जड? कुठे आणि कसा पाहायचा सामना, लगेच जाणून घ्या..

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून टी 20 चा रनसंग्राम; टी-20 मालिकेचे वेळापत्रक कसे आहे? सामना कुठे पाहता येणार? जाणून घ्या…

November 23, 2023
10 टीम आणि 1 ट्रॉफी! आजपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात; सामने टीव्हीवर कोणत्या चॅनेलवर दिसणार? टीम इंडियाच्या सामन्यांचं वेळापत्रक

भारताचं स्वप्न भंगलं! ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा जगज्जेता; इंडियाचा लाजिरवाणा पराभव

November 19, 2023
कौतुकास्पद! जर्मनीच्या जागतिक कृषी प्रदर्शनात स्क्रिनवर झळकले मंगळवेढ्यातील शेतकरी जोडपे; भारतीय शेतकरी म्हणून निवड

कौतुकास्पद! जर्मनीच्या जागतिक कृषी प्रदर्शनात स्क्रिनवर झळकले मंगळवेढ्यातील शेतकरी जोडपे; भारतीय शेतकरी म्हणून निवड

November 17, 2023
दीपावलीत लक्ष्मीपूजन कसे करावे?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

धन-धान्याची बरकत! दिवाळीत लक्ष्मी पूजनाची सर्वोत्तम वेळ, महत्त्व, घर, ऑफिसमधील पूजेचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या…

November 12, 2023
Next Post
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

लहान मुलांचं आधार कार्ड बनवण्यासाठी उशीर करू नका; जाणून घ्या कोणते कागदपत्र लागतात

ताज्या बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा