टीम मंगळवेढा टाईम्स।
राज्याच्या गृह विभागाने भापोसे, रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात २९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून झाली आहे.
तर धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक म्हणून झाली आहे.
नागपूरच्या राज्य राखीव पोलिस बदल गट क्र. चार येथील प्रियंका नारनवरे यांची पोलिस अधीक्षक, लोहमार्ग नागपूर या पदावर बदली करण्यात आली होती. ती बदली रद्द करण्यात आल्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पोलिस महासंचालकांनी कायदा व सुव्यवस्था निवडणुकीची आदर्श आचारंहिता अशा बाबी लक्षात घेवून कार्यवाही करावी, असेही गृह विभागाने त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंकज शिरसाट (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), अतुल झेंडे (पोलिस उपायुक्त, ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (पोलि अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे), विनायक नरळे (अपर पोलिस अधीक्षक, पालघर), अभिजीत शिवथरे (अपर पोलिस अधीक्षक, रायगड), राहुल माकणीकर (पोलिस उपायुक्त, नागपूर),
लक्ष्मीकांत पाटील (पोलिस अधीक्षक, सायबर सुरक्षा, मुंबई), विजयकांत सागर (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), वैशाली कडूकर (अपर पोलिस अधीक्षक सातारा), दिपाली धाटे (पोलिस उपायुक्त, बृहन्मुंबई), सुरज गुरव (अपर पोलिस अधीक्षक, नांदेड) यांच्याही बदल्या झाल्या आहेत.
बदली झालेले अधिकारी
अतुल कुलकर्णी : सोलापूर पोलिस अधीक्षक, श्रीकृष्ण कोकाटे : हिंगोली पोलिस अधीक्षक’ सुधाकर पठारे : सातारा पोलिस अधीक्षक, अनुराग जैन : वर्धा पोलिस अधीक्षक, विश्व पानसरे : बुलढाणा पोलिस अधीक्षक
शिरीष सरदेशपांडे : पुणे पोलिस अधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संजय वाय. जाधव : धाराशिव पोलिस अधीक्षक, कुमार चिंता : यवतमाळ पोलिस अधीक्षक, आंचल दलाल : राज्य राखीव पोलिस बल गट क्र. एक समादेशक (पुणे), नंदकुमार ठाकूर : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षक केंद्र, दौंड
निलेश तांबे : प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर, पवन बनसोडे : पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती, नुरूल हसन : समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ११, नवी मुंबई, समीर शेख : पोलिस उपायुक्त, मुंबई शहर
अमोल तांबे : पोलिस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ मनिष कलवानिया : पोलिस उपायुक्त, मुंबई शहर, अपर्णा गिते : कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई, दिगंबर प्रधान : पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज