जिल्हा परिषदेत बळीरामकाका आले हसत म्हणाले , राजीनाम्यावर मंगळवारी फैसला राष्ट्रवादीतील गटबाजी : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर होणार चर्चा
टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबतचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हेच घेतील. साठे यांनी राजीनामा देऊ नये याबाबत त्यांचे मत वळविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
मात्र, अंतिम निर्णय खा.पवार हेच घेतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी दिली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिल्याने राजकीय खळबळ उडाली होती.
आता साठे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर येणार याची चर्चा सुरू झाली.
यांच्या नावावर चर्चा रंगत आहे
माळशिरसचे उत्तमराव जानकर, उमेश पाटील, माजी आमदार राजन पाटील की पुन्हा दीपक साळुंखे-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगत आहे.
दरम्यान, साठे यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्वरित गुरुवारी साठे यांना मुंबईला बोलावले.
यावेळी साठे यांच्यासोबत मोहोळचे आमदार यशवंत माने, महेश कोठे, दिलीप कोल्हे, बिपीन करजोळे, महेश माने, जयदीप साठे, मनोज साठे, बसवराज बगले ही समर्थक मंडळी सोबत होती.
यावेळी उपस्थित नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासमोर जिल्ह्यात आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले वातावरण असून साठे यांनी अचानक राजीनामा दिल्याने पक्षीय वातावरण बिघडेल,
निवडणूक होईपर्यंत साठे हेच जिल्ह्याचे अध्यक्ष रहावे
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होईपर्यंत साठे हेच जिल्ह्याचे अध्यक्ष रहावे, अशी मागणी केली. साठे यांच्याही अडचणी ऐकूण त्यांची घेण्यात आल्या.
राजीनामा देण्यावर ते ठाम
बळीरामकाकांची मानसिकता एकूणच काम करत असताना होत असलेला त्रास, वयाची अडचण पाहता राजीनामा देण्यावर ते ठाम असल्याचे ही सांगण्यात आले.
खा.शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मुक्कामी
सोलापूर शहर व जिल्ह्यातून आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जयंत पाटील यांनी साठे यांच्या राजीनाम्याचा निर्णय केवळ खा.शरद पवार हेच घेतील.
त्यांची भेट घेण्याची सूचना पाटील यांनी साठे यांना केली, त्यानुसार सर्व शिष्टमंडळ मुंबईत खा.पवार यांची भेट घेण्यासाठी मुक्कामी राहिले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज