टीम मंगळवेढा टाइम्स।
राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक कल्याण मंत्री नवाब मलिक यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. नवाब मलिक यांच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
दि.7 मार्चपर्यंत नावब मलिक ईडी कोठडीच राहणार आहेत. 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान नवाब मलिक जेजे रूग्णालयात भर्ती होते.
त्यामुळे त्यादिवसांत त्यांची चौकशी होऊ शकली नाही, म्हणून आणखीन रीमांडची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीने कोर्टात केला.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक झाली. 23 फेब्रुवारी 2022 रोजी 14.45 वाजता अटक करण्यात आली.
यानंतर 25 फेब्रुवारी रोजी पोटदुखीच्या तक्रारीनंतर मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नवाब मलिक यांना 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांना पुन्हा तुरुंगात आणण्यात आले.
दोन दिवस फुकट गेल्याने चौकशीचा वेळ भरुन काढण्यासाठी ईडीने आणखी रिमांडची मागमी केली. त्यानुसार मलिक यांच्या कोठडीत 7 मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध नोंदवलेला मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.
आपली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी तात्काळ सुटका करण्याची मागणी याचिकेत केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज