दुगार्देवीच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शक्तिरूपाची पूजा करण्याचा नऊ दिवसांचा नवरात्रोत्सव आज १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्र सुरू झाल्यापासून दहाव्या दिवसापर्यंत सर्व घरांमध्ये विधिवत पद्धतीने दुगार्देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.
शनिवारी पहाटे पाचपासून दुपारी पावणेदोनपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करणे लाभदायक असल्याची माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. Navratri Special; It is beneficial to perform pujan by getting engaged till 2 pm
विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे २५ आॅक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो.
या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २.१८ ते ३.०४ या दरम्यान आहे.
या वर्षी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे भागामध्ये २३ आॅक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास असून, उर्वरित महाराष्ट्रामध्ये २४ आॅक्टोबर रोजी महाअष्टमी उपवास करावा, असेही दाते यांनी सांगितले आहे.
नवरात्रीच्या नवव्यादिवशी दसरा…
दरम्यान, मंगळवार २० आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी, २३ आॅक्टोबरला महालक्ष्मी पूजन, २४ रोजी महाअष्टमीचा उपवास, २५ आॅक्टोबर रोजी रविवारी नवरात्र समाप्त होणार असून, याचदिवशी दसरा साजरा होणार आहे.
सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन व दसरा एकाच दिवशी किंवा वेगवेगळ्या दिवशी आले तरी घटस्थापनेपासून दसºयापर्यंत नऊ दिवस किंवा दहा दिवसांचे अंतर असते. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी दसरा आहे. यापूर्वी अनेक वेळेस असे झाल्याचे दाते यांनी सांगितले.
देवी उपासनेचा काळ…
हिंदू संस्कृतीमध्ये कोणतेही काम करण्याचा एक शुभमुहूर्त असतो. त्याप्रमाणे घटस्थापनेचाही एक शुभमुहूर्त असतो. नवरात्र उत्सवाची सुरुवात आज (शनिवार) आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घटस्थापनेने होणार आहे.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात. नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो. रात्री देवापुढे बसून उपासना, जप, ग्रंथवाचन, देवीची भजने, स्तोत्रं म्हटली जातात.
या घटासमोर बसून उपासना करणा?्यांचे मन शांत, प्रसन्न व स्थिर होते. देवीची त्या भक्तावर कृपा होते. त्याला सुख, शांती अन् समाधान लाभते.
Navratri Special; It is beneficial to perform pujan by getting engaged till 2 pm
बंगला विकणे आहे.
३००० चौ.फूट एन.ए.प्लॉट , साधारण ५०० चौ.फूट मध्ये आर.सी.सी. वन बी.एच.के. बांधकाम,बोअरचे मुबलक पाणी , ज्ञानदीप शाळेपासून फक्त ५०० फुट अंतरावर , अपार्टमेंट , बँक , हॉस्पिटल , हॉलसाठी उपयुक्त ठिकाण , कारखाना रोडपासून दोन नंबरचा प्लॉट , दोन रोडटच कॉर्नर प्लॉट योग्य किंमत आल्यास त्वरीत विकणे आहे.
संपर्क:मो.नं.९८९०९८०८७७,९५६१८२११९९
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज