टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा शहरालगत असलेल्या मंगल कार्यालयात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरूध्द बालविवाह लावण्यास मदत केल्याप्रकरणी
गौस बेद्रेकर, बाबू बेद्रेकर, नसीम बेद्रेकर, अल्फिया बेदरेकर (सर्व रा.पंढरपूर ) निहाल मसुरे, नसीम मसुरे (रा.हजारे गल्ली, मंगळवेढा), अजहर कलाल (लातूर),
नजीर मसुरे, रेहाना मसुरे, रतीलाल जबडे व ५० ते ६० वऱ्हाडी मंडळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, शहराजवळील असलेल्या मंगल कार्यालयात दि.२२ रोजी दुपारी १२.३० वा. नवरा मुलगा गौस बेद्रेकर त्याचे वडील बाबू बेद्रेकर, त्याची आई नसीम बेद्रेकर, बहिण अल्फिया बेद्रेकर,
मुलीचे वडील निहाल मसुरे, आई नसीम निहाल मसुरे तसेच मुलीचा मामा अजहर कलाल, चुलते नजीर मसुरे, चुलती रेहाना मसुरे, कॅमेरामन रतीलाल जबडे व इतर उपस्थित ५० ६० लोकांनी
१६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरूध्द लग्नाचे वय पुर्ण नसताना बालविवाह लावला असल्याची फिर्याद ग्रामविकास अधिकारी गोरख मच्छिंद्र जगताप (रा.सोहाळे) यांनी पोलिसात दिल्यावर वरील आरोपीविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलिस करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज