टीम मंगळवेढा टाईम्स।
जमीन नावावर करणे करीता अंगठा का देत नाही या रागाच्या भरात सासूचा जावयाने काटा काढला असून चाकूने वार करून खून केला आहे. ही धक्कादायक घटना आज पहाटे 1 च्या सुमारास मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर या गावात घडली आहे.
सौ.शाकुबाई मारुती कोकरे (वय.47 रा. नंदेश्वर) असे खून झालेल्या सासूचे नाव असून याप्रकरणी जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ (रा.नंदेश्वर ता.मंगळवेढा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.23 ऑक्टोबर रोजी पहाटे 12.30 च्या सुमारास यातील फिर्यादीची बहीण शाकुबाई मारूती कोकरे (वय 47) ही रहाते घरी तिची मुलगी मोनाबाई,
जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ व मुलगी समृध्दी व समीक्षा असे घरात झोपले असताना बहीण शाकुबाई हिचे वडील राजाराम शेजाळ यांचे नावे असलेली पाच एकर जमीन
नावावर करणे करीता अंगठा का देत नाही या कारणावरून फिर्यादीचे बहीणीचा जावई दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळ याने तिला चाकुने भोसकुन जीवे ठार केले असावे असा फिर्यादीचा संशय आहे.
घटनास्थळी पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी भेट दिली आहे.
दादा उर्फ राजाराम बाबुराव शेजाळे याच्या विरुद्ध भा.दं.वि कलम 302, सह शस्त्र अधिनियम 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज