टीम मंगळवेढा टाईम्स ।
जकराया साखर कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी साखर नानासाहेब बाबर यांना ‘बेस्ट अॅग्रिकल्चर पुरस्कार मिळाला आहे.
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार साखर आयुक्त शेखर गायकवाड, भारतीय शुगर डायरेक्टर चारूदत्त देशपांडे, भारतीय शुगर अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते मुख्य शेती अधिकारी नानासाहेब बाबर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी केन मॅनेजर विजय महाजन, ऊस पुरवठा अधिकारी सुभाष बेदरे, दशरथ कोळी, दत्तात्रय जाधव यांच्या कारखान्याचे कर्मचारी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी.बी. जाधव, कार्यकारी संचालक सचिन जाधव, तज्ज्ञ संचालक राहुल जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी यांनी नानासाहेब बाबर यांचे अभिनंदन केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज