ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन फिर्यादी राम बाबासाहेब ओलेकर (रा सलगर खुर्द) यांना शिविगाळी करत हातातील तलवार डोक्यात मारल्या प्रकरणी सलगर खुर्दच्या सरपंच सुपुत्र विठ्ठल शामराव सरगर व इतर पाच जणांना 30 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी न्यायाधीस आर.व्ही.नडदगल्ली यांनी सुनावली.
दि.25 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास सलगर खुर्द येथील फिर्यादीची बहिण मिराबाई धुळाप्पा करपे हिच्या घरासमोर मिराबाई करपे व भाऊसाहेब लेंगरे यांचेमध्ये सांडपाण्याचे कारणावरून सुरु असलेल्या भांडणामध्ये फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा तानाजी बहिण , भाचा असे समजावून सांगत असलाना सरपंचपुत्र विठ्ठल शामराव सरगर याने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विरोधी गटाचे काम केल्याचा राग मनात धरुन त्यांना शिविगाळी करत त्याने हातातील तलवारीने तु विरोधी गटाचे काम करतो.
इथे कशाला आला तुला दसरा सण बघु देत नाही असे म्हणुन फिर्यादीचे डोकीत मारुन गंभीर जखमी केले. तसेच त्याचे सोबतच्या लोकांनी त्याचे हातातील काठीने फिर्यादीची बहिण मिराबाई भाचा सुरेश व मुकेश यांना मारहाण केली आहे.
तसे फिर्यादीचा मुलगा तानाजी हा भांडणाची शुटींग करीत असताना दुसरा सरपंच पुत्र दत्ता शामराव सरगर याने हातात तलवार घेवुन त्याचा पाठलाग केला.दरम्यान सर्वांनी फिर्यादीच्या बहिणीच्या घरावर दगडफेक करुन फिर्यादीच्या मोटार सायकलची मोडतोड करुन नुकसान केले आहे.
याप्रकरणी सरपंच पुत्र विठ्ठल शामराव सरगर व दत्ता शामराव सरगर,सुरावंती शामराव सरगर,गजेंद्र वसंत सरगर,गौतम बंडगर, सचिन मासाळ (सर्व रा.सलगर खुर्द यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरकारी वकील धनंजय बनसोडे यांनी काम पाहिले याप्रकरणी सरपंचासह सुपुत्र विठ्ठल शामराव सरगर व इतर पाच जणांना 30 ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी न्यायाधीस आर.व्ही.नडदगल्ली यांनी सुनावली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज