टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर येणार असून त्या दौऱ्यात त्यांनी श्री संत दामाजी पंत, चोखामेळा, कान्होपात्रा, समाधी स्थळाला भेट देणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी दिली.

या दौऱ्यात त्या सोलापूर येथून दुपारी १२ वाजता मंगळवेढा येथे येणार असून मंगळवेढा शहरातील संत कान्होपात्राच्या समाधीला भेट देऊन १२.१५ वाजता
रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा यांच्या घरी भेट देऊन दुपारी १२.३० ते १ या दरम्यान दामाजीपंत व चोखामेळा या समाधी स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर त्या पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत.

२०२१ झालेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला होता पराभवानंतर राष्ट्रवादीचे नेते तालुका जनतेच्या प्रश्नासंदर्भात म्हणावे तितके सक्रिय नसल्यामुळे
गत आठवड्यात पवार कुटुंबाचा सोलापूर दौरा वाढला आहे. पंढरपूर व मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीला बूस्टर डोस देणार का याकडेही लक्ष लागले आहे.
दरम्यान, पंढरपूरची जबाबदारी सोपवलेले कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार हे नुकतेच पंढरपूर दौऱ्यावर येऊन गेले तर खासदार सुप्रिया सुळे या मंगळवेढा दौऱ्यावर पुन्हा येऊ लागल्या असल्यामुळे

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांची भेट ही महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या दौऱ्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या गट व पक्ष मजबुतीसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













