मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात सर्वाधिक चर्चेत राहणारा नाविक म्हणजे पिंटू महाराज आता पुन्हा एकचा चर्चेत आला आहे. पिंटूने अवघ्या ४५ दिवसांत ३० कोटी रुपयांची कमाई करून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या नाविकाच्या कमाईचा उल्लेख केला. पिंटू महाराकडे एकूण १३० नाव होत्या आणि दररोज सरासरी २३ लाख रुपये कमावले. मात्र, एवढ्या मोठ्या उत्पन्नावर त्याला किती कर भरावा लागणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
३० कोटींच्या कमाईवर किती कर द्यावा लागेल?
आयकर नियमांनुसार १५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींवर ३०% कर लागू होतो. त्यामुळे नाविक पिंटू महाराच्या ३० कोटींच्या उत्पन्नावर एकूण करदायित्व जवळपास १२ कोटी ८० लाख रुपये एवढे होईल.
यामध्ये इनकम टॅक्स ८.९८ कोटी रुपये त्यावर सरचार्ज ३.३२ कोटी रुपये आणि हेल्थ आणि एज्युकेशन सेस ४९.२१ लाख रुपये द्यावे लागतील.
मात्र, व्यावसायिक उत्पन्नावर झालेला खर्च वजा करून कर आकारला जातो. जर पिंटू महारा आपल्या खर्चानंतर २० कोटींचे निव्वळ उत्पन्न दाखवले तर त्याला अंदाजे ८.५२ कोटी रुपये कर भरावा लागेल.
पिंटू महाराने एवढी मोठी कमाई कशी केली?
महाकुंभसाठी पिंटू महाराने तब्बल ७० नवीन नाव बांधल्या होत्या. यासाठी त्याने बँकेकडून कर्ज घेतले आणि दागिने गहाण ठेवले. त्याच्याकडे एकूण १३० नाव होत्या. ज्याद्वारे त्याने महाकुंभ दरम्यान दररोज सुमारे ५०,००० ते ५२,००० रुपये प्रति नाव कमावले.
विशेष म्हणजे या मोठ्या व्यवस्थापनासाठी पिंटूच्या सोबत ३०० पेक्षा जास्त कामगार कार्यरत होते. या प्रचंड कमाईमुळे पिंटू महाराचे नाव सध्या चर्चेत आहे. महाकुंभसाठी होणारी गर्दी आणि त्यातून उत्पन्न कमवण्याची संधी शोधणाऱ्या पिंटूच्या सक्सेस स्टोरीची सध्या देशभरात चर्च सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज