टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या वर्षीदेखील पाऊस किती व कधी पडेल याचा अंदाज हवामान विभागाने दिला. बहुतांश वेळा हवामान विभागाने दिलेला अंदाज बरोबर आला, तर काहीवेळा अंदाज वर्तवून ही जोराचा न पडता रिमझिम पाऊस पडला.
वेधशाळा आणि उपग्रहांकडून मिळणारी माहिती यावरून हवामानाचा घटकांचा, परिस्थितीचा एकमेकांवर आणि एकूणच वातावरणावर परिणाम पाहण्यात येतो. याचे विश्लेषण हवामान अभ्यासक करत असतात, पण प्रत्येकवेळी हा अंदाज बरोबर येतोच असा नाही.
जमलेले ढग, त्यांची घनता, त्यांच्यातील आर्द्रता, त्यांची जमिनीपासूनची उंची, त्या उंचीवरचं तापमान आणि वाऱ्याचा वेग यांचा अभ्यास करण्यात येतो. सॅटेलाइट इमेजेस आणि स्थानिक डोपलर रडार्सच्या माध्यमातून पावसाचा अंदाज वर्तविला जातो.
जिल्ह्यात पावसाची सुरुवात चांगली तरीही…
यंदाचा पावसाळ्याची चांगली सुरुवात झाली. जून ते २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात २८४ मिमी इतका पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ४७१ मिमी. म्हणजे १६६ टक्के इतका पाऊस पडला.
जिल्ह्यातील सहा तालुक्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या सरासरी इतका व त्यापेक्षा अधिक पाऊस पडला. दि. १६ ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या मघा नक्षत्रात एखाद्या दिवसाचा अपवाद सोडला तर दररोज पाऊस पडला.
अंदाज का चुकू शकतो?
भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात यातील बहुसंख्य घटक दर तासाला बदलत असतात. ते कसे कधी का बदलतील हे सांगता येणं अवघड असते. त्यामुळे भारतात पावसाचे भाकीत हे पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे सांगितले जाते. ही शक्यता दर तासाने बदलत राहण्याची शक्यता असते.
लो, ऑरेंज, रेड अलर्ट म्हणजे काय?
■ ग्रीन अलर्ट : सर्वकाही सुरळीत आहे. घाबरण्याची काही चिता नाही.
येलो अलर्ट : हा सावध राहा असा संदेश देणारा अलर्ट आहे. हवामानाच्या बदलामुळे संकट ओढावू शकते. ७.५ ते १५ मिमी पाऊस होऊ शकतो.
ऑरेंज अलर्ट : कोणत्याही संकटासाठी नागरिकांना तयार करण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला जातो. वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीजपुरवठा बंद होणे, वाहतूक ठप्प होणे, असे प्रकार घडू शकतात.
रेड अलर्ट : नैसर्गिक संकटात नागरिकांना सतर्क राहण्यासाठी ‘रेड अलर्ट जारी होतो. लोकांना स्वतः ला आणि इतरांना सुरक्षित राखावे, धोकादायक भागात जाऊ नये.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज