टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील एका २० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजयकुमार मेटकरी याचेविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मूळची जिगजोणी ता.इंडी जि.विजापूर येथील व खवे येथे सध्या वास्तव्यास असलेली सदर महिला ही २८/१२/२०२० रोजी रात्रौ ९ च्या सुमारास भाऊ व मुलासह जेवणखाण करून घरात झोपलेली असताना विजयकुमार वसंत मेटकरी (रा.खवे) हा तेथे दारू पिवून आला.
त्यावेळेस फिर्यादीने त्याला मी तुम्हाला ओळखत नाही, आता सध्या रात्र झाली आहे.माझे घरी मोठे कोणीही नाही, तुम्ही काय काम असेल तर सकाळी या असे सांगत असताना आरोपीने फिर्यादीस तुझ्या घरी कोण नसले म्हणून काय झाले , तुला मी आहे.
असे म्हणून फिर्यादीच्या घरात येवून फिर्यादीच्या हातास धरून जवळ घेवून तीच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले व शिवीगाळी करून घरातील लाईट , बल्ब , वायर तोडून फोडून नुकसान केले.
या प्रकरणी पिडीत महिलेने मंगळवेढा पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूध्द भा.दं.वि.सं.कलम ४५२,३५४,५०४,५२७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक आवटे हे करीत आहेत.
चोरटी वाळू वाहतूक करणारे दोन टमटम सांगोला पोलिसांनी पकडले
पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांनी विनापरवाना शासनाची रॉयल्टी न भरता एक ब्रास वाळू चोरून वाहतूक करीत असताना २ लाख रुपयांच्या दोन टमटमसह ४ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा सुमारे २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई मंगळवार २ ९ डिसेंबर रोजी मिरज रोडवरील गौरी पेट्रोल पंपासमोर व कोपटेवस्ती जवळ केली.
पोलीस नाईक विजय थिटे , प्रमोद गवळी , पोकॉ सिद्धनाथ शिंदे , पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील असे तिघेजण मिळून मंगळवार २ ९ रोजी स . ६:३० च्या सुमारास सांगोला शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कोपटेवस्ती जवळ एम.एच .१३ एएन ९ १८२ हा टमटम येताना दिसला म्हणून पोलिसांनी चालकास इशारा करून थांबवला असता टमटम सोडून दोघेजण पळून गेले.
पोलिसांनी पळून गेलेल्या इसमाबाबत चौकशी केली असता त्यांची नावे पप्पू मेटकरी व समाधान सरगर असल्याचे समजले. याबाबत पोलिसांनी टमटमची पाहणी केली असता त्यात वाळू आढळून आली.
पोलिसांनी वाळूसह टमटम असा १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . तर मिरज रोडवरील गौरी पेट्रोल पंपाच्या समोर बिगर नंबरचा टमटम येत असताना पोलिसांना दिसून आला . पोलिसांना पाहताच टमटममध्ये बसलेले तिघेजण पळून गेले.
पोलिसांनी टमटमची पाहणी केली असता त्यात अर्धा ब्रास वाळू आढळून आली. याप्रकरणी पोकॉ सिद्धनाथ शिंदे यांनी पप्पू मेटकरी , समाधान सरगर , यांच्यासह अज्ञात तिघांविरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज