टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपी शिक्षकास दोषी धरत तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली.
कोहिनूर सय्यदनूर सय्यद असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून रवींद्र वाघमारे असे निर्दोष झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित शिक्षक शाळेतील एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करीत होता. तिने एके दिवशी वडिलांस हा प्रकार सांगताच त्यांनी शाळेत जाऊन वाघमारे यांना याची माहिती दिली.
त्यावर कोणतीच कारवाई न करता शिक्षकाची बाजू घेऊन दुसरा आरोपी बोलत राहिला. त्यानंतर ही बाब गावातील पालकांना समजताच त्यांनी आरोपीस जाऊन जाब विचारताच वाघमारे यांनी आरोपीवर कारवाई करण्याऐवजी त्यास साथ दिल्याचा आरोप होता.
त्यानंतर पीडितेच्या पित्याने वैराग पोलिसांत फिर्याद दिली आणि बाललैंगिक अत्याचार व इतर गुन्ह्यानुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
याचा तपास पोलिस निरीक्षक किरण आवचर व सहायक पोलिस निरीक्षक आर. पी. खांडेकर यांनी करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
याप्रकरणात मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच नऊ साक्षीदारांच्या तपासणीत गोळा केलेले पुरावे सरकारी वकील राजश्री कदम यांनी न्यायालसमोर सादर केले.
बार्शी येथील विशेष जिल्हा न्यायाधीश एल. एस. चव्हाण यांनी सय्यद यास पोक्सो अंतर्गत तीन वर्षे सक्त मजुरी व तीन हजारांचा दंड सुनावला.
दंड न भरल्यास आणखी चार महिने शिक्षा सुनावली. कोर्टपैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार कुणाल पाटील व सहायक फौजदार शशिकांत आळणे यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज