टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे घरात विवाहीत महिला ऐकटी आसल्याची संधी साधून घरात घुसून एका २१ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हजरत इमाम शेख याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहीती आशी की, पीडित महिला ही नंदेश्वर येथील राहत्या घरी तिचे पती व सासरे शेत पेरणीसाठी शेतात गेल्याने घरात एकटीच स्वयपांक करीत बसली होती.
त्याच गावातील आरोपी हजरत शेख याने वाईट हेतूने ९.३० वाजता घरात घूसून हात पकडून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले,
यावेळी पिडीतेने घाबरून आरडा ओरड करताच कोणाला सांगू नको नाहीतर बघ असा दम दिल्याचे तक्रारीत म्हठले असून अधिक तपास प्रभारी अधिकारी स.पो. नि.बापुसो पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज