टीम मंगळवेढा टाईम्स ।
लसीकरणाचं काम केंद्राने स्वतःकडेच ठेवायचा मोठा निर्णय घेतला असल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 21 जूनपासून सर्व 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याची जबाबदारी केंद्राची असेल, हे त्यांनी स्पष्ट केलं.
कोरोना ही गेल्या शंभर वर्षातली सर्वांत भयानक महासाथ, महामारी आहे. या अदृश्य आणि रूप बदलणाऱ्या शत्रूशी लढायचं असेल तर सर्वात मोठं अस्त्र कोविड प्रोटोकॉल हेच आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर स्वच्छतेचे नियम पाळले तरच ही साथ आटोक्यात राहील. लसीकरण हे आपलं सुरक्षा कवच आहे”, असं मोदी म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण आधी का केलं, राज्यांना का अधिकार दिले गेले नाहीत याबाबत केंद्र सरकारला विचारलं गेलं. काहींंनी त्याबद्दल टीराही केली.
राज्य सरकारला आपापल्या पातळीवर प्रयत्न करत असतील तर केंद्राला काहीच अडचण नाही. म्हणून 16 जानेवारीपासून एप्रिलपर्यंत केंद्र सरकारच लसीकरण करत होते. त्यानंतर प्रयोग म्हणून 1 मे पासून 25 टक्के लसीकरणाचं काम राज्यांना दिलं गेलं. राज्यांनी आपापल्या पद्धतीने त्यासाठी प्रयत्नही केले.
साऱ्या जगात लशींची परिस्थिती काय आहे हे राज्यांच्याही लक्षात आलं. मेमध्ये दुसरी लाट घातक होत असतानाच लसीकरणात गडबड उडाली. पहिली व्यवस्थाच चांगली होती, असं काही राज्यांनी सांगितलं. 1 मे पूर्वी जी व्यवस्था होती, तशीच ती करावी अशी मागणी वाढली. आता राज्यांकडे असलेली
21 जूनपासून देशातल्या 18 वर्षांपुढच्या सर्वांसाठी केंद्र सरकार मोफत लस देणार. राज्यांकडे त्यांचा कोटा दिला जाईल, अशी मोठी घोषणा मोदींनी केली.
“मागच्या 50-60 वर्षांचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल विदेशातून भारतात लशी यायच्या. परदेशात सगळं लसीकरण पूर्ण झालं तरी आपल्या देशात लस द्यायला सुरुवातही व्हायची नाही.
2014 मध्ये देशानं आम्हाला संधी दिली त्या वेळी भारतात लसीकरणाचं कव्हरेज 60 टक्क्यांच्या आसपास होता. आता ते 90टक्क्यांवर आलं आहे”, असं मोदी म्हणाले.
“लहान मुलांना अनेक जीवघेण्या आजारांपासून वाचवण्यासाठी लसीकरणात काही नवी लशी आणल्या गेल्या. गरिबांच्या चिंतेपोटी हे केलं. लसीकरणाचं लक्ष्य 100 टक्के होत असतानाच कोरोनाने आपल्याला घेरलं.
आता भारत एवढ्या मोठ्या लोकसंख्येला वाचवू शकेल का याचीच चर्चा जगात होती. पण नीती साफ असेल, नियंत्रण असे तर त्याचे परिणाम दिसतात”, असंही त्यांनी सांगितलं.
“देशात वर्षभरात दोन Made in India लसी आल्या. अनेक मोठ्या देशांपेक्षा आपला देश मागे नाही, हे भारताने दाखवलं. मी आज बोलत आहे, तोपर्यंत देशभरात 23 कोटी डोस दिले गेले आहेत. विश्वासेन सिद्धी, असं म्हणतात.
आपल्या प्रयत्नांना तेव्हाच यश मिळतं जेव्हा स्वतःवर विश्वास असतो. आपल्या वैज्ञानिकांवर विश्वास ठेवूनच त्यांचं संशोधनाचं काम सुरू होतं तेव्हाच लॉजिस्टिकचं काम सुरू झालं.”
“गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाची संख्या हजारांमध्ये होती, तेव्हाच व्हॅक्सिन टास्क फोर्स तयार करण्यात आला. देशात सध्या 7 कंपन्या वेगवेगळ्या लसी तयार करत आहे. दुसऱ्या देशातल्या कंपन्यांनाही लस खरेदीसाठी संपर्क करण्यात आला आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी दोन कंपन्यांच्या ट्रायल्स सुरू आहेत”, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज