mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिलांनो! मोदी सरकारच्या ‘या’ कल्याणकारी योजना तुमच्यासाठी, घरबसल्या घ्या लाभ

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 22, 2021
in राज्य, शैक्षणिक
महत्वाची बातमी! आजपासून ‘हे’ नियम बदलले, थेट आपल्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

टीम मंगळवेढा टाईम्स ।

केंद्र सरकारच्या अनेक योजना केवळ महिलांसाठी आहेत. मोदी सरकारने महिला सशक्तीकरणाच्या दिशेने अनेक पावले उचलली आहेत. ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात देशातील महिलांना मिळत आहे.

सरकारचा उद्देश आहे की, महिलांनी सुद्धा पुरूषांसोबत खांद्याला खांदा लावून पुढे जावे. तशीही प्रत्येक क्षेत्रात महिलांची भागीदारी वाढत चालली आहे. मोदी सरकारच्या महिलांसाठी कोण-कोणत्या कल्याणकारी योजना आहेत ते जाणून घेवूयात…

पंतप्रधान उज्ज्वला योजना

ही महिलांसाठी मोदी सरकारची सर्वात यशस्वी योजना आहे. 1 मे 2016 ला उत्तर प्रदेशच्या बलियातून या योजनेची सुरूवात झाली होती.
या योजनेच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या कमजोर गृहिणींना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिला जातो.

आतापर्यंत देशातील 8.3 कोटी कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. 1 फेब्रुवारी 2021 ला अर्थमंत्री निर्मला सीतरामान यांनी बजेटमध्ये उज्ज्वला योजनेचा लाभ आणखी 1 कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची घोषणा केली आहे.

या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार तेल कंपन्यांना प्रत्येक कनेक्शनवर 1600 रुपयांची सबसिडी देते. ही सबसिडी सिलेडरला सिक्युरिटी आणि फिटिंग शुल्कासाठी असते. ज्या कुटुंबाच्या नावावर बीपीएल कार्ड आहे,

ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेचा उद्देश महिलांना लाकूड किंवा कोळशाच्या धुरूपासून मुक्त करण्याचा आहे.

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

देशातील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी पीएम धनलक्ष्मी योजनेची सुरुवात केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना रोजगार-व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येते.

या कर्जाचे व्याज सरकार भरते. म्हणजे व्याजमुक्त लोनची सुविधा दिली जाते. देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय महिलांना याचा लाभ दिला जातो.

फ्री शिलाई मशीन योजना

ज्या महिलांना शिवणकामात आवड आहे, त्यांच्यासाठी केंद्र सरकारकडून फ्री शिलाई मशीन योजना चालवली जाते. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमजोर महिला घेऊ शकतात.

भारत सरकारकडून प्रत्येक राज्यात 50,000 पेक्षा जास्त महिलांना निशुल्क शिलाई मशीन प्रदान केली जाते. या योजनेंच्या अंतर्गत केवळ 20 ते 40 वर्षाच्या वयाच्या महिला अर्ज करू शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

मोदी सरकारने 22 जानेवारी 2015 ला सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात केली होती. ही स्कीम 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली, बालिकांच्या उच्च शिक्षणासाठी आणि विवाहासाठी आहे.

मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी ही बचत योजना आहे. कोणत्याही बँक आणि पोस्ट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आपल्या 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीचे अकाऊंट उघडू शकता. स्कीम पूर्ण झाल्यानंतर सर्व पैसे तिला मिळतील, जिच्या नावावर अकाऊंट उघडलेले असेल.

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 ला हरियाणाच्या पानीपतमध्ये केली होती. या योजनेचा उद्देश मुलींची लिंग गुणोत्तर घट कमी करणे आणि महिला सशक्तीकरणाला प्रात्सोहन देणे आहे. ही योजना भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रात राबवली जाते.

ही योजना त्या महिलांना मदत करते ज्या घरगुती हिंसेला बळी पडतात. जर कुणी महिला अशा प्रकारच्या हिंसेला बळी पडली तर तिला पोलीस, कायदा, वैद्यकीय अशाप्रकारच्या सेवा दिल्या जातात. पीडित महिला टोल टोल फ्री नंबर 181 वर कॉल करून मदत घेऊ शकते.

सुरक्षित मातृत्व आश्वासन सुमन योजना

या योजनेच्या अंतर्गत 100 टक्केपर्यंत हॉस्पीटल किंवा प्रशिक्षित नर्सेसच्या देखरेखीखाली महिलांची प्रसुती केली जाते. जेणेकरून प्रसुतीदरम्यान माता आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची चांगली देखभाल केली जाऊ शकते.

या अंतर्गत निशुल्क आरोग्य सेवा मिळतात. माता आणि नवजात बालमृत्यू रोखणे हा या योजनेचा उद्देश आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: महिलामोदी सरकारयोजना

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल; नेमकं कारण काय?

February 22, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

खुर्ची तीच, फक्त नाव बदलले! ग्रामंपचायतींवर सरपंचांना प्रशासक बनवून सरकारने साधली ‘राजकीय सोय’

February 22, 2026
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील रविवारी वाढले ‘एवढे’ रुग्ण वाचा ‘कुठे’ आढळले नवे कोरोनाबाधित

ब्रेकिंग! कोरोनाच्या भीतीने 'या' जिल्ह्यात आठवड्याभरासाठी लाॅकडाऊन जाहीर

ताज्या बातम्या

मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

February 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

सुतार इंटरनॅशनल स्कूलवर कारवाईची भीती कुणाला? पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेने पालक संतप्त; २० विद्यार्थ्यांचे करिअर राख रांगोळी करणाऱ्या सुतार स्कूलवर पोलीस मेहेरबान का?

February 28, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! सरपंचांच्या प्रशासकपदाला ब्रेक; उच्च न्यायालयाचे ‘या’ जिल्ह्यांसाठी अंतरिम आदेश

February 28, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

बापरे..! दहा हजारांचे झाले दोन लाख, तरीही सावकाराचा तगादा; मजुरी करणाऱ्या तरुणानं चिठ्ठी लिहून जीवन संपवलं

February 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

​मंगळवेढा कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल! गाळेधारकांची याचिका फेटाळली; संबंधित प्रशासनाचा मार्ग मोकळा

February 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा